Advertisements
Advertisements
प्रश्न
वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा.
लघु उत्तर
उत्तर
वसंतची शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पुढील प्रमाणे:
- मीराचा आरडाओरडा ऐकून वसंतला शाळेची आठवण झाली.
- 'दादा, मले साळांत कवा धाडणार?'
- त्याच्या मनात शिक्षणाविषयीची उलघाल होत होती. शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशीच झोपला.
- सडकेवर पडलेल्या कागदावर वसंतची नजर खिळली, तसा वसंतन कागद उचलून हातात धरला; पण कागदावरच्या संस्कृतमधल्या शब्दांचा उलगडा नीट होत नव्हता.
- 'ताई, मला सडकेवर कागद गवसला. त्यावर काय लिव्हलंय बग?'
- 'अगं पण दादानंच शिक्षण तोडल, तवा वाचायला तरी कसं येणार, ताई काही झालं तरी मी शिकणारच.'
- कोपी बाहेर चाललेलं सगळं बोलणं आपल्या विषयी असल्यानं वसंतला उभारी आली.
- वसंतनं लगेच मित्रांना गाठलं. 'आता म्या साळंला येणार,' असं वसंत सगळ्यांना सांगत सुटला.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?