मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

व्युत्पत्ती कोश या पाठाच्या आधारे शब्दांचे विविध अर्थ व समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ याविषयी सविस्तर लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

व्युत्पत्ती कोश या पाठाच्या आधारे शब्दांचे विविध अर्थ व समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ याविषयी सविस्तर लिहा.

थोडक्यात उत्तर

उत्तर

काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्परसंबंधांत बदल होतात. हे बदल अपरिहार्य असतात. ते व्युत्पत्ती कोशाच्या अभ्यासातून समजून घेणे सहज शक्य होते.

बऱ्याच वेळा भाषेत एक शब्द विविध अर्थांनी वापरला जातो. शब्दाची मूळ व्युत्पत्ती एका अर्थाची असली तरीही कालओघात या शब्दांना वेगळा अर्थ प्राप्त होऊन तो प्रचलित होतो. पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा अर्थ भाषेत स्थिरावतो.

उदा. 'शहाणा' या शब्दाचा अर्थ पूर्वी हुशार, बुद्धिमान, चालाख असा होता. या शब्दाची 'सज्ञान' या शब्दावरून व्युत्पत्ती झाली असावी. आता मात्र 'शहाणा' या शब्दाचा 'अतिशहाणा' असा अर्थही रूढ होत आहे.

अनेक वेळा समान दिसणाऱ्या शब्दांचेही वेगवेगळे अर्थ आपणांस भाषेत गवसतात. मग प्रसंगाला आणि वाक्याला अनुसरून त्यांचा अर्थ लक्षात घ्यावा लागतो.

उदा. 'तार' या शब्दाचा एक अर्थ धातूचा पातळ धागा, तर दुसरा अर्थ 'पूर्वीच्या काळी त्वरेने संदेश पाठवण्याचे साधन' असा होतो.

अशाप्रकारे, भाषेमधील अनेक बारकावे, काळानुरूप तिच्यात झालेले बदल जाणून घेण्यासाठी व्युत्पत्ती कोश उपयुक्त ठरू शकतो.

shaalaa.com
व्युत्पत्ती कोश
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 16.2: व्युत्पत्ती कोश - स्वाध्याय

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi (Second Language) 10 Standard SSC
पाठ 16.2 व्युत्पत्ती कोश
स्वाध्याय | Q १.

संबंधित प्रश्‍न

टीप लिहा.

व्युत्पत्ती कोशाचे कार्य


खालील मुद्‌द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)


पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.


टिपा लिहा.

शब्द तयार होण्याचे विविध प्रकार


खालील मुद्‌द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)


पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.

शब्द अनेक, अर्थ एक व्युत्पत्ती कोश शब्द एक, अर्थ अनेक
उदा., जल, नीर, तोय... - पाणी   उदा., पान -
पान - झाडाचे पान (पर्ण)
पान - पुस्तकाचे पान (पृष्ठ)

व्युत्पत्ती कोश आजच्या युगात किती आवश्यक आहे ते उदाहरणे देऊन सांगा.


टिपा लिहा.

व्युत्पत्ती कोशाची निर्मिती


व्युत्पत्ती कोश पाहण्यासाठीची पद्धत सोदाहरणासहित सांगा.


पुढील मुद्द्यांवर एक परिच्छेद तयार करा.

व्युत्पत्ती कोश
निर्मितीचा ठराव निर्मितीची जबाबदारी निर्मितीसाठी अर्थसाहाय्य

व्युत्पत्ती कोश कसा पाहावा ते स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×