Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)
खालील मुद्दयांवर एक परिच्छेद तयार करा.
उत्तर
व्युत्पत्ती कोश: एखाद्या शब्दाबद्दलचे कुतूहल शमवण्यासाठी आपण व्युत्पत्ती कोशाची मदत घेतो. व्युत्पत्ती कोशात आपल्याला मूळ शब्द कसा, केव्हा, कुठे निर्माण झाला हे तर कळतेच परंतु अन्य भाषांत तो शब्द कसा आला आहे व कोणत्या रूपात आहे, हेही कळते. असा हा शब्दांचा किमयागार कसा अस्तित्वात आला हे समजून घेणे उद्बोधक ठरेल.
१९३८ साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली 'व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे' असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. कृ. पां. कुलकर्णी यांच्यावर संपादनाची जबाबदारी सोपवण्यात आली. बॅ. मुकुंदराव जयकर यांनी अर्थ साहाय्य केले व श्री. दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे निर्मितीस भरीव मदत केली. अखेर १९४६ साली मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले.
संबंधित प्रश्न
खालील मुद्द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)
पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.
टिपा लिहा.
शब्द तयार होण्याचे विविध प्रकार
पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.
शब्द अनेक, अर्थ एक | व्युत्पत्ती कोश | शब्द एक, अर्थ अनेक |
उदा., जल, नीर, तोय... - पाणी | उदा., पान - पान - झाडाचे पान (पर्ण) पान - पुस्तकाचे पान (पृष्ठ) |
व्युत्पत्ती कोश या पाठाच्या आधारे शब्दांचे विविध अर्थ व समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ याविषयी सविस्तर लिहा.
व्युत्पत्ती कोश आजच्या युगात किती आवश्यक आहे ते उदाहरणे देऊन सांगा.
टिपा लिहा.
व्युत्पत्ती कोशाची निर्मिती
टिपा लिहा.
व्युत्पत्ती कोश
व्युत्पत्ती कोश पाहण्यासाठीची पद्धत सोदाहरणासहित सांगा.
पुढील मुद्द्यांवर एक परिच्छेद तयार करा.
व्युत्पत्ती कोश | ||
निर्मितीचा ठराव | निर्मितीची जबाबदारी | निर्मितीसाठी अर्थसाहाय्य |
व्युत्पत्ती कोश कसा पाहावा ते स्पष्ट करा.