Advertisements
Advertisements
प्रश्न
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. चौकटी पूर्ण करा. (2)
- शक्तीचीही झडते - ______
- चैतन्याचे फिरे - ______
या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार फुलामुलांतून हसतो श्रावण या हातांनी यंत्र डोलते हजार आम्ही एकी बळकट या विश्वाची विभव संपदा |
२. आकृती पूर्ण करा. (2)
३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)
- बळकट -
- आभाळ -
- संपदा -
- अपरंपार -
४. काव्यसौंदर्य: (2)
‘घराघरांतून जन्म घेतले तेज नवा अवतार।’ या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर
१.
- शक्तीचीही झडते - नौबत
- चैतन्याचे फिरे - सुदर्शन
२.
३.
- बळकट - प्रबळ
- आभाळ - मेघ/ढग
- संपदा - द्रव्य
- अपरंपार - अनंत
४. कवी किशोर पाठक यांनी ‘स्वप्न करू साकार’ या कवितेमध्ये उद्याचा भारत सक्षम घडवण्यासाठी येणाऱ्या नवीन पिढीचे तेजोमय मूल्य अधोरेखित करताना प्रस्तुत ओळ लिहिली आहे. नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करण्यासाठी काय नेमके करावे, हे सांगताना कवी म्हणतात, आपण सर्व अनेक धर्मपंथाचे असंख्य लोक असलो तरी आपली एकजूट महत्त्वाची आहे. आपल्या मनगढातील ताकद एकवट आहेत. घराघरांतून जन्मलेले प्रत्येक बालक म्हणजे तेजाचा नवीन अवतार आहे. त्यांच्या स्वागतासाठी एकजुटीच्या शक्तीची नौबत झडते आहे.
राष्ट्रीय एकात्मता, हे मूल्य व तेज:पुंज नवीन पिढी यांची सुयोग्य सांगड या ओळीत प्रकर्षाने जाणवते.