English

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।। १. चौकटी पूर्ण करा. (i) शक्तीचीही झडते - ______ आकृती पूर्ण करा. उत्क्रांतीचा ललकार घुमवणारे घटक -

Advertisements
Advertisements

Question

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. चौकटी पूर्ण करा. (2)

  1. शक्तीचीही झडते - ______
  2. चैतन्याचे फिरे - ______

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार
नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।

फुलामुलांतून हसतो श्रावण
मातीचे हो मंगल तनमन
चैतन्याचे फिरे सुदर्शन
शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।

या हातांनी यंत्र डोलते
श्रमशक्तीचे मंत्र बोलते
उद्योगाचे चक्र चालते
आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार।।

हजार आम्ही एकी बळकट
सर्वांचे हो एकच मनगट
शक्तीचीही झडते नौबत
घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।

या विश्वाची विभव संपदा
जपू वाढवू आम्ही लाखदा
हस्त शुभंकर हवा एकदा
भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।।

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)

  1. बळकट - 
  2. आभाळ -
  3. संपदा -
  4. अपरंपार -

४. काव्यसौंदर्य: (2)

‘घराघरांतून जन्म घेतले तेज नवा अवतार।’ या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.

Answer in Brief

Solution

१. 

  1. शक्तीचीही झडते - नौबत
  2. चैतन्याचे फिरे - सुदर्शन

२.

३. 

  1. बळकट - प्रबळ
  2. आभाळ - मेघ/ढग
  3. संपदा - द्रव्य
  4. अपरंपार - अनंत

४. कवी किशोर पाठक यांनी ‘स्वप्न करू साकार’ या कवितेमध्ये उद्याचा भारत सक्षम घडवण्यासाठी येणाऱ्या नवीन पिढीचे तेजोमय मूल्य अधोरेखित करताना प्रस्तुत ओळ लिहिली आहे. नव्या पिढीचे व नव्या युगाचे स्वप्न साकार करण्यासाठी काय नेमके करावे, हे सांगताना कवी म्हणतात, आपण सर्व अनेक धर्मपंथाचे असंख्य लोक असलो तरी आपली एकजूट महत्त्वाची आहे. आपल्या मनगढातील ताकद एकवट आहेत. घराघरांतून जन्मलेले प्रत्येक बालक म्हणजे तेजाचा नवीन अवतार आहे. त्यांच्या स्वागतासाठी एकजुटीच्या शक्तीची नौबत झडते आहे.

राष्ट्रीय एकात्मता, हे मूल्य व तेज:पुंज नवीन पिढी यांची सुयोग्य सांगड या ओळीत प्रकर्षाने जाणवते.

shaalaa.com
स्वप्न करू साकार
  Is there an error in this question or solution?
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×