Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
युरोपातील १५-१६ वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्षकाळ समजला जातो.
टीपा लिहा
उत्तर
- १५ व्या - १६ व्या शतकात युरोपात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीचा विकास झाला. विज्ञानात नवे नवे प्रयोग सुरु झाले.
- माणसाच्या बुद्धीला, प्रतिभेला आणि जीवन पद्धतीला नवी दिशा मिळाली.
- वैज्ञानिक पद्धतीने विश्वाची रहस्ये उलगडता येतात, हे समजून घेण्यात लोकांना रुची वाटू लागली.
- काव्य, नाटक, साहित्य, कला यांमध्ये दुर्लक्षित राहिलेले विषय हाताळण्यात येऊ लागले.
- विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना ईश्वर हा केंद्रबिंदू मानण्याऐवजी मानव हा केंद्रबिंदू बनला.
- अशा रितीने मानवाच्या झालेल्या या वैचारिक बदलांमुळे युरोपातील १५ वे - १६ वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्षकाळ समजला जातो.
shaalaa.com
युरोपातील प्रबोधनाचा काळ
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?