मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली. - History [इतिहास]

Advertisements
Advertisements

प्रश्न

औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली.

थोडक्यात उत्तर

उत्तर

(१) औद्योगिकीकरणासाठी आवश्यक असलेले लोहखनिज व कोळशाचे साठे इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते.

(२) दमट हवामानामुळे सुती धागे बनवणे सोपे जात असल्यामुळे इंग्लंडमध्ये सुती कापडाचा उद्योग भरभराटीस आला.

(३) इंग्लंडचा साम्राज्यविस्तार मोठा असल्यामुळे वसाहतींमधून मोठ्या प्रमाणात कच्चा माल मिळणे शक्य झाले.

(४) कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालात करून तो माल वसाहतींमध्ये विकणे इंग्लंडला त्याच्या नाविक सामर्थ्यामुळे शक्य झाले.

(५) व्यापारातून झालेल्या नफ्यातून इंग्लंडमधील व्यापाऱ्यांकडे अतिरिक्त भांडवल उपलब्ध झाले.

(६) कमी मोबदल्यात कामगारांचे श्रम उपलब्ध झाल्यामुळे वस्तूंच्या किमती आटोक्यात ठेवणे शक्य झाले, त्यामुळे त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली.

अशा रितीने औद्योगिक क्रांतीला अनुकूल असणारे सर्व घटक इंग्लंडकडे उपलब्ध असल्यामुळे औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली.

shaalaa.com
औद्योगिक क्रांती
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1: युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास - स्वाध्याय [पृष्ठ ९]

APPEARS IN

बालभारती History [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
पाठ 1 युरोपातील प्रबोरन आणि विज्ञानाचा विकास
स्वाध्याय | Q ५.२ | पृष्ठ ९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×