Advertisements
Advertisements
प्रश्न
युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाचे परिणाम स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
- धर्मयुद्धांमुळे युरोपातील सरंजामशाहीचा अंत झाला.
- पोपवरील लोकांची श्रद्धा कमी झाली.
- मध्य आशियाबरोबर वाढलेल्या व्यापारामुळे इटलीतील आणि जर्मनीतील शहरांना नवी क्षेत्रे खुली झाली, त्यामुळे नवा व्यापारी वर्ग उदयाला आला.
- किल्ले बांधणी, किल्ल्यांचा लढाईचे ठाणे म्हणून उपयोग, लष्कराच्या वाहतुकीसाठी पूलबांधणी, शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे इत्यादी युद्धतंत्रात युरोपीय राष्ट्रांनी प्रावीण्य मिळवले.
- लढाईचा खर्च भागवण्यासाठी युरोपातील राजांनी नवे कर लागू केले.
- युरोपीय लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती, अत्तरे, फळे, पोषाखाचे विविध प्रकार, साखर, सुती व रेशमी कापड, मसाल्याचे पदार्थ, औषधे इत्यादी गोष्टींचा परिचय झाला.
- अरबांशी झालेल्या संपर्कातून रसायन, संगीत, व्यापार या क्षेत्रांतील अनेक अरबी शब्द युरोपियनांना माहीत झाले.
shaalaa.com
युरोपातील धर्मयुद्धे (क्रुसेडस) आणि त्याचे दूरगामी परिणाम
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?