Advertisements
Advertisements
Question
एका रुपयाच्या नोटेव्यतिरिक्त आणखी कोणकोणते शोध तुम्हांला महत्त्वाचे वाटतात, ते स्पष्ट करा.
Solution
अनूच्या व्यक्तिमत्त्वामुळे एक वेगळाच शोध मला लागला आहे. कोणाच्याही प्रभावाखाली न येता, स्वत: स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे, स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा एखाद्याचा दृष्टिकोन असू शकतो. अनू असा दृष्टिकोन फक्त बाळगते असे नाही; तर ती तसे जगायचे ठरवते. डॉक्टर होण्याची पात्रता असूनही ती नर्स होते. स्वत:च्या इच्छेने, स्वत:च्या बुद्धीने ती नर्सचा पेशा स्वीकारते. सामाजिक व आर्थिक दृष्टीने डॉक्टरपेक्षा खालच्या पातळीवरचा पेशा स्वीकारते. विशेष म्हणजे खालच्या पातळीवरचा पेशा असूनही ती खुशीत, आनंदात राहते. संपूर्ण हॉस्पिटलचे मन ती जिंकते. थोडक्यात ती प्रतिष्ठा मिळवते. आपल्या आवडीचा पेशा पत्करल्यावर प्रतिष्ठितपणे जगता येते, हे अनूवरून कळते. हा माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा शोध आहे. माझा पेशा आता मीच ठरवणार.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
अनूने घर सोडले; कारण ______________
अनूने डॉक्टर व्हावे, असे कथानिवेदकाला वाटले; कारण ______________
खालील नातेसंबंध लिहा.
अनु आणि आबा ___________
खालील नातेसंबंध लिहा.
भिडे दाम्पत्य आणि टॅक्सी ड्रायव्हर ___________
खालील नातेसंबंध लिहा.
अनू आणि सुनीता ___________
कृती करा.
अनुच्या मते डॉक्टर होण्यासाठी आवश्यक गोष्टी
घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
अनुला समाज कसा समजून घ्यायचा आहे, ते थोडक्यात स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
कुतूहल, जिज्ञासा निर्माण करणाऱ्या कथेतील एका प्रसंगाचे वर्णन करा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
कथेला कलाटणी देणारा एक प्रसंग शब्दबद्ध करा.
तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
टॅक्सी ड्रायव्हरचा स्वभावविशेष.
‘शोध’ कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
कथेच्या 'शोध' या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा.
'स्वत:चा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचं ऐकतो त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व, निसर्गानं जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो,' या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.
कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र तुम्हांला आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण स्पष्ट करा.
‘उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा, उत्तम नर्स होणं कठीण आहे.’ या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.
अनु व सुनीता यांच्यात निर्माण झालेला भावनिक बंध लिहा.
'शोध' कथेतील 'टॅक्सी ड्रायव्हर' या पात्रा विषयीचे तुमचे मत लिहा.