Advertisements
Advertisements
Question
कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र तुम्हांला आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण स्पष्ट करा.
Solution
'शोध' या कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र मला आवडले आहे. तो साधा, सरळ मनाचा, सालस वृत्तीचा माणूस आहे. लबाड्या करणे, दाखवेगिरी करणे हा त्याचा स्वभाव नाही. मनाचा सरळपणा हा त्याचा स्थायिभाव आहे. तो दिवसरात्र टॅक्सी चालवतो. त्याला दुपारी जेवायलाही मिळाले नाही. मध्यरात्री तो उसळपाव खातो. असा माणूस पैशासाठी हपापलेला असला, तरी समजून घेता येईल. पण तो स्वभावाने सालस आहे. हे त्याच्या वागण्यावरून दिसून येते. समाजात टॅक्सीवाल्यांना प्रतिष्ठा नाही, मानसन्मान नाही, हे त्याला ठाऊक आहे. म्हणून भिड्यांनी आपणहून केलेल्या मदतीबद्दल तो त्यांचा अपार कृतज्ञ आहे.
अनूची हकिगत ऐकल्यानंतर तो ज्या तन्हेने व्यक्त झाला, त्यावरून त्याची वैचारिक प्रगल्भता दिसते. सर्वसाधारण नर्स रुग्णामध्ये मानसिक दृष्ट्या गुंतत नाही. अनू तशी नाही. अनूचा हा मोठेपण तो ओळखतो. या टॅक्सी ड्रायव्हरसारखी व्यक्ती विरळच असते. म्हणून टॅक्सी ड्रायव्हर ही व्यक्तिरेखा मला आवडली आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
अनूने घर सोडले; कारण ______________
‘जगाकडं पाहताना मला माझा चष्मा हवा’, असं अनु म्हणाली. कारण ______________
खालील नातेसंबंध लिहा.
भिडे दाम्पत्य आणि टॅक्सी ड्रायव्हर ___________
खालील नातेसंबंध लिहा.
अनू आणि सुनीता ___________
कृती करा.
अनुच्या मते डॉक्टर होण्यासाठी आवश्यक गोष्टी
कृती करा.
आबांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये
नुने आबांजवळ व्यक्त केलेल्या विचारांतून डॉक्टरचा पेशा आणि नर्सचा पेशा यांतील फरक स्पष्ट करा.
डॉक्टरचा पेशा |
नर्सचा पेशा |
घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
अनुला समाज कसा समजून घ्यायचा आहे, ते थोडक्यात स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
कुतूहल, जिज्ञासा निर्माण करणाऱ्या कथेतील एका प्रसंगाचे वर्णन करा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
कथेला कलाटणी देणारा एक प्रसंग शब्दबद्ध करा.
तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी.
तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
टॅक्सी ड्रायव्हरचा स्वभावविशेष.
‘शोध’ कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
एका रुपयाच्या नोटेव्यतिरिक्त आणखी कोणकोणते शोध तुम्हांला महत्त्वाचे वाटतात, ते स्पष्ट करा.
कथेच्या 'शोध' या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा.
'स्वत:चा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचं ऐकतो त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व, निसर्गानं जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो,' या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.
‘उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा, उत्तम नर्स होणं कठीण आहे.’ या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.
अनु व सुनीता यांच्यात निर्माण झालेला भावनिक बंध लिहा.
'शोध' कथेतील 'टॅक्सी ड्रायव्हर' या पात्रा विषयीचे तुमचे मत लिहा.