English

तुमच्या शब्दांत माहिती लिहा.भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी. - Marathi

Advertisements
Advertisements

Questions

तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी.

भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी स्पष्ट करा.

Explain
Very Long Answer

Solution

भिडे दाम्पत्य हे सरळ, साध्या वृत्तीचे. पूर्णपणे चांगुलपणा असलेले. लपवाछपवी, लबाड्या न करणारे. हातचे राखून न वागणारे. निष्कपट, सच्छील वृत्तीचे. ते परळहून लॅमिंग्टन पोलीस स्टेशनजवळ टॅक्सीने यायला निघाले. रात्री १२-१२.३० वाजण्याची वेळ. दुर्दैवाने त्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस आला. तो जगणे अशक्य होते. या प्रसंगात टॅक्सीवाल्याला जबर शिक्षा झाली असती. तो आयुष्यातूनच उठला असता. टॅक्सीवाल्याचा सालसपणा, सज्जनपणा भिड्यांना खूप भावला होता. तशात त्या टॅक्सीवाल्याची काडीचीही चूक नव्हती. साधारणपणे टॅक्सीवाल्यावर कोणीही विश्वास ठेवला नसता आणि कोणीही त्याला मदत केली नसती. टॅक्सीवाल्यांकडे तुच्छतेनेच पाहिले जाते. त्यांना क्षुद्र समजले जाते. अशा वातावरणात भिडे दाम्पत्यांची कृती खूपच उठून दिसते. मध्यरात्र उलटून गेलेली होती. मृत्यूसंबंधातील केसमध्ये कोणीही जवळपास जायलाही तयार होत नाहीत. भिडे स्वत:हून तयार झाले. पोलीस स्टेशनला हेलपाटे घालावे लागण्याची शक्यता असते. आपण अकारण अडचणीत येण्याचीही शक्यता असते. तरीही भिडे दाम्पत्याने मनापासून टॅक्सीवाल्याला मदत केली. त्यांच्या साक्षीमुळे तो प्रचंड मोठ्या संकटातून वाचला होता. गरिबांना, सज्जनांना मदत करण्याची भिड्यांची ही वृत्ती त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवते.

shaalaa.com
शोध
  Is there an error in this question or solution?
Chapter 3.01: शोध - कृती (५) [Page 77]

APPEARS IN

Balbharati Marathi - Yuvakbharati [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
Chapter 3.01 शोध
कृती (५) | Q 1 | Page 77

RELATED QUESTIONS

अनूने घर सोडले; कारण ______________


‘जगाकडं पाहताना मला माझा चष्मा हवा’, असं अनु म्हणाली. कारण  ______________


अनूने डॉक्टर व्हावे, असे कथानिवेदकाला वाटले; कारण ______________


खालील नातेसंबंध लिहा.
अनु आणि आबा ___________


खालील नातेसंबंध लिहा.
भिडे दाम्पत्य आणि टॅक्सी ड्रायव्हर ___________


खालील नातेसंबंध लिहा.
अनू आणि सुनीता ___________


कृती करा.

अनुच्या मते डॉक्टर होण्यासाठी आवश्यक गोष्टी


कृती करा.

आबांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये


नुने आबांजवळ व्यक्त केलेल्या विचारांतून डॉक्टरचा पेशा आणि नर्सचा पेशा यांतील फरक स्पष्ट करा.

डॉक्टरचा पेशा

नर्सचा पेशा

   
   
   
   
   
   

घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
टॅक्सी ड्रायव्हरचा स्वभावविशेष.


‘शोध’ कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.


एका रुपयाच्या नोटेव्यतिरिक्त आणखी कोणकोणते शोध तुम्हांला महत्त्वाचे वाटतात, ते स्पष्ट करा.


कथेच्या 'शोध' या शीर्षकाची समर्पकता स्पष्ट करा.


'कथेतील टॅक्सी ड्रायव्हरने जीवनातील वास्तवाचा घेतलेला शोध' तुमच्या शब्दांत लिहा.


'स्वत:चा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचं ऐकतो त्याच क्षणी तो स्वतःचं अस्तित्व, निसर्गानं जगाकडे पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो,' या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.


कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र तुम्हांला आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण स्पष्ट करा.


‘उत्तम डॉक्टर होण्यापेक्षा, उत्तम नर्स होणं कठीण आहे.’ या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.


अनु व सुनीता यांच्यात निर्माण झालेला भावनिक बंध लिहा.


'शोध' कथेतील 'टॅक्सी ड्रायव्हर' या पात्रा विषयीचे तुमचे मत लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×