English

आकृती मध्ये दाखविल्यानुसार T हा बिंदू आयत PQRS च्या अंतर्भागात आहे, तर सिद्ध करा, TS2 + TQ2 = TP2 + TR2 (आकृतीत दाखवल्याप्रमाणे A-T-B असा रेख AB || बाजू SR काढा.) - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

आकृती मध्ये दाखविल्यानुसार T हा बिंदू आयत PQRS च्या अंतर्भागात आहे, तर सिद्ध करा, TS2 + TQ2 = TP2 + TR(आकृतीत दाखवल्याप्रमाणे A-T-B असा रेख AB || बाजू SR काढा.)

Sum

Solution

पक्ष: `square`PQRS हा आयत आहे. बिंदू T हा आयत `square`PQRS च्या अंतर्भागात आहे. 

साध्य: TS2 + TQ2 = TP2 + TR

रचना: रेख AB || बाजू SR असा काढा, की A-T-B.

सिद्धता:

`square`PQRS हा आयत आहे. ........[दिलेले]

∴ PS = QR ....(i) [आयताच्या संमुख बाजू]

`square`ASRB मध्ये

∠S = ∠R = 90°  ....(ii) [आयत PQRS चे कोन]

बाजू AB || बाजू SR ......[रचना]

तसेच, `{:(∠"A" = ∠"S" = 90°), (∠"B" = ∠"R" = 90°):}}` .....[दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय, (ii) वरून]

∴ ∠A = ∠B = ∠S = ∠R = 90°  ....(iii)

∴ `square`ASRB हा आयत आहे.

 

∴ AS = BR  .....(iv) [आयताच्या संमुख बाजू]

ΔPTS मध्ये, ∠PST हा लघुकोन आहे.

व रेख AT ⊥ बाजू PS  ......[(iii) वरून]

∴ TP2 = PS2 + TS2 - 2PS.AS .....(v) [पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन]

ΔTQR मध्ये, ∠TRQ हा लघुकोन आहे.

व रेख BT ⊥ बाजू QR  ......[(iii) वरून]

∴ TQ2 = RQ2 + TR2 - 2RQ.BR ....(vi) [पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन]

TP2 - TQ2 = PS2 + TS2 - 2PS.AS - RQ2 - TR2 + 2RQ.BR .....[(v) मधून (vi) वजा करून]

∴ TP2 - TQ2 = TS2 - TR2 + PS2 - RQ2 - 2PS.AS + 2RQ.BR

∴ TP2 - TQ2 = TS2 - TR2 + PS2 - PS2 - 2PS.BR + 2PS.BR  .....[(i) व (iv) वरून]

∴ TP2 - TQ2 = TS2 - TR2

∴ TS2 + TQ2 = TP2 + TR

shaalaa.com
पायथागोरसच्या प्रमेयाचे उपयोजन
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: पायथागोरसचे प्रमेय - सरावसंच 2.2 [Page 43]

APPEARS IN

Balbharati Geometry (Mathematics 2) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 2 पायथागोरसचे प्रमेय
सरावसंच 2.2 | Q 5. | Page 43
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×