English

आकृती पूर्ण करा. पंतांची आस्था वाढू लागलेल्या गोष्टी - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

आकृती पूर्ण करा.

Diagram

Solution

shaalaa.com
उपास
  Is there an error in this question or solution?
Chapter 4.1: उपास - कृती [Page 13]

APPEARS IN

Balbharati Marathi - Aksharbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 4.1 उपास
कृती | Q (१)(अ) | Page 13

RELATED QUESTIONS

आकृती पूर्ण करा.


कारणे शोधा.

वजन कमी करण्यासाठी न बोलण्याचा उपाय पंतांना जमणार नव्हता, कारण ___


'उपास' या पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.

बाळसेदार भाज्या-


'उपास' या पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.

वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो.


तुम्ही एखादा संकल्प केला आणि तो पूर्ण केला नाही तर कुटुंबातील व्यक्ती कोणत्या प्रतिक्रिया व्यक्त करतील, याची कल्पना करून लिहा.


पंतांच्या उपासाबाबत त्यांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह तुमच्या शब्दांत वर्णन करा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१.

i. आकृती पूर्ण करा. (०१)

लेखकाने उपोषण सुरू केल्यावर लोकांची ऐकू येणारी बोलणी- ______

ii. चौकट पूर्ण करा. (०१)

लेखकाची आस्था ज्या शब्दांबद्दल वाढू लागली ते शब्द- ______

माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी 'नाही ती भानगड' आहे, उगीच 'हात दाखवून अवलक्षण ' आहे, 'पेललं नाही तेव्हा खाजगी झालं!' अशी वाक्ये माझ्या  कानांवर येऊ लागली; पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 'एकशे एक्क्याऐंशी पाैंड.' रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळयांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. “घोरत तर असता रात्रभर!” अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे.

 “दोन महिन्यांत पन्नास पाैंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!” अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या ‘कॅलरीज’ मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय; परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या  उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला ‘डाएटचा’ सल्ला दिला. उदाहरणार्थ - सोकाजी त्रिलोकेकर.

२. कोण ते लिहा.  (०२)

१. लेखक पूर्वीसारखे गाढ झोपत नाही यावर विश्वास न ठेवणारी ______

२. लेखकाला डाएटचा सल्ला देणार ______

३. स्वमत कृती (०३)

तुम्ही केलेल्या एखाद्या भीष्मप्रतिज्ञेबद्दल माहिती लिहा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

आकलन कृती

१. आकृतिबंध पूर्ण करा. (०२)

“तुला सांगतो मी पंत, 'डाएट' कर. बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढू नकोस.”

“हो! 'म्हणजे कुठं राहाता?' म्हणून विचारलं तर नुसतं 'चाळीत राहतो' म्हणा. 'बटाट्याची चाळ' म्हणू नका. वजन वाढेल! खी: खी: खी:!” जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय!

पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. “ए इडिअट! सगळ्याच गोष्टींत जोक काय मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंत-तू बटाटा सोड.” मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली.

“बटाट्याचं ठीक आहे; पण पंत, आधी भात सोडा.” एक सल्ला. “भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं? आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठं आहेत लठ्ठ? तुम्ही डाळ सोडा.” काशीनाथ नाडकर्णी.

“मुख्य म्हणजे साखर सोडा.”

“मी सांगू का? मीठ सोडा.”

“लोणी-तूप सोडा-एका आठवड्यात दहा पाैंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेडक्लार्कच्या वाइफचं घटलं.”

“तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा.” बाबूकाका.

“दिवसा झोपणं सोडा.”

“खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढतं.”

मी मात्र या सर्व जनांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. पहिला उपाय म्हणून मी 'आहारपरिवर्तन' सुरू केले.

२. आकलन कृती 

कोण ते लिहा.  (०२)

अ) लेखकाला तेल व तळलेले पदार्थ सोडायला सांगणारे 

आ) उताऱ्याच्या आधारे 'आहारपरिवर्तन' हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.

३. स्वमत (०३)

'लेखकाने ऐकावे जनाचे करावे मनाचे असे ठरवले' लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का?


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)

१. आकलन कृती

 १. खालील चौकटी पूर्ण करा. (०१)

   १.लेखकाचे कुचकट स्वभावाचे शेजारी -______

   २.लेखकाने वजनकाट्यात टाकलेले नाणे- ______

 २. लेखकाचे वजन कमी करण्याचे दोन खात्रीशीर उपाय -

पंधरवडाभरात फक्त दोन वेळाच साखरभात झाला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबीभात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. त्यामुळे मुख्यत: चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळीचा आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. जी मंडळी माझी, माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करत होती त्यांनीच “पंत, फरक दिसतो हं!” अशी कबुली द्यायला सुरुवात केली.

जनोबा रेग्यांसारख्या अत्यंत कुजकट शेजाऱ्यालाही “पंत, भलतेच काय हो रोडावलेत.” असे मान्य करावे लागले. मंडळीच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची म्हणजे मूठभर मांस वाढण्याची; पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो.

इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हानियंत्रणानंतर कमीत कमी वीस ते पंचवीस पाैंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिससमोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणेली टाकून तिकीट काढले. महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन एकशे एक्याऐंशी पाैंड दाखवले होते. एक महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन...

मिनिटभर माझा विश्वासच बसेना. एकशे ब्याण्णव पाैंड आणि भविष्य होते: 'आप बहुत समझदार और गंभीर है!'

हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आहे आणि विशेषत: डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे, छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो.

२. आकलन कृती

  १. योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा. (०१)

  अ) जवळजवळ ______ दिवस हा क्रम चालू होता. (पाचसहा, सातआठ, नऊदहा, दहाबारा)

 आ) दुर्दौवाने रोज गाईचे ______ दूध मिळण्याची सोय नव्हती. (ताजे, सकस, गरम, धारोष्ण)

 २. अनेक शब्दांसाठी एक शब्द लिहा. (०१)

 १. साखर घालून केलेला भात ______ 

 २. पंधरा दिवसांचा समूह______

३. स्वमत (०३)

लेखकाने आपले आहार व्रत कसे चालू ठेवले होते ते तुमच्या शब्दांत लिहा. (०३)


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

       माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी 'नाही ती भानगड' आहे, उगीच 'हात दाखवून अवलक्षण' आहे, 'पेललं नाही तेव्हा खाजगी झालं !' अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली; पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 'एकशे एक्क्याऐंशी पौंड.' रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्‍वास नव्हता. "घोरत तर असता रात्रभर!'' अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे.

     "दोन महिन्यांत पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!'' अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या 'कॅलरीज' मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले.

  1. उपोषणाची बातमी चाळीत जाहीर झाल्यावर कानांवर येणारी वाक्ये लिहा.      (2)
    1. ______
    2. ______
  2. आकृतिबंध पूर्ण करा:        (2)
    1. कार्डवर दाखवलेले वजन - ______

  3. स्वमत:
    वजन कमी करण्यासाठी लेखकाने केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.     (3)

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×