Advertisements
Advertisements
प्रश्न
आकृती पूर्ण करा.
उत्तर
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
'उपास' या पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.
भीष्म प्रतिज्ञा
'उपास' या पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.
वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो.
'उपास' या पाठाधारे खालील संकल्पनांचा अर्थ स्पष्ट करा.
असामान्य मनोनिग्रह -
पंतांच्या उपासाबाबत त्यांच्या पत्नीचा अवर्णनीय उत्साह तुमच्या शब्दांत वर्णन करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
आकलन कृती
१. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)
१. उपास हे कोणाचे खास कुरण होते?
२. लेखकाच्या वजनक्षय संकल्पाला कोणी सुरुंग लावला?
“उगीच आरडाओरडा नका करू. वजनाचं ते काय मेलं? होईल हळूहळू कमी आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही. स्वत:च कमवून खातो म्हणावं. वाढलं तर तर वाढू दे वजन.” मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशी ठेवत आणि माझ्या वजनक्षयसंकल्पाला आणखी नवे सुरुंग लावीत ती उद्गारली. “लाडू कशाला केलेस? साखर असेल त्यात!” “इश्श! साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कुणी!” तात्पर्य, चहा बिनसाखरेचा होता हे खरे; परंतु लाडवाच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच! दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली, कारण आठ गुणिले दहाच्या आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यादा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात राहून दोरी फिरवली ती आचार्य बर्व्यांच्या गळ्यात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली; परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण 'उपास' हे त्यांचे खास राखीव कुरण होते. “हा दुष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं; पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या ह्या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखा बळी पडला असता, तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हांला क्षमा करतो.” |
२. आकलन कृती
१. खालील घटनेचा परिणाम लिहा. (०१)
घटना: लेखकाने दोरीवरची पहिली उडी मारली.
परिणाम: _____
२. पुढील विधान सत्य की असत्य ते लिहा. (०१)
बाबा बर्व्यांचा लेखकावर आधीपासूनच राग होता.
३. स्वमत (०३)
'लेखकाने ऐकावे जनाचे करावे मनाचे असे ठरवले' लेखकाच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का?
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)
१. आकलन कृती
१. खालील चौकटी पूर्ण करा. (०१)
१.लेखकाचे कुचकट स्वभावाचे शेजारी -______
२.लेखकाने वजनकाट्यात टाकलेले नाणे- ______
२. लेखकाचे वजन कमी करण्याचे दोन खात्रीशीर उपाय -
पंधरवडाभरात फक्त दोन वेळाच साखरभात झाला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबीभात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता. एवढे अपवाद वगळल्यास भाताला स्पर्श नाही केला. त्यामुळे मुख्यत: चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळीचा आदर दुणावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. जी मंडळी माझी, माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करत होती त्यांनीच “पंत, फरक दिसतो हं!” अशी कबुली द्यायला सुरुवात केली. जनोबा रेग्यांसारख्या अत्यंत कुजकट शेजाऱ्यालाही “पंत, भलतेच काय हो रोडावलेत.” असे मान्य करावे लागले. मंडळीच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती ती एकाच गोष्टीची म्हणजे मूठभर मांस वाढण्याची; पण असली तुरळक तारीफ ऐकून मी चळण्यासारखा नव्हतो. इतक्या असामान्य मनोनिग्रह आणि जिव्हानियंत्रणानंतर कमीत कमी वीस ते पंचवीस पाैंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती व त्या खात्रीने मी आमच्या ऑफिससमोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणेली टाकून तिकीट काढले. महिन्यापूर्वी याच यंत्राने माझे वजन एकशे एक्याऐंशी पाैंड दाखवले होते. एक महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या इत्यादी उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन... मिनिटभर माझा विश्वासच बसेना. एकशे ब्याण्णव पाैंड आणि भविष्य होते: 'आप बहुत समझदार और गंभीर है!' हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आहे आणि विशेषत: डाएटच्या आहारी तर या जन्मात जाणार नाही. छे, छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. |
२. आकलन कृती
१. योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा. (०१)
अ) जवळजवळ ______ दिवस हा क्रम चालू होता. (पाचसहा, सातआठ, नऊदहा, दहाबारा)
आ) दुर्दौवाने रोज गाईचे ______ दूध मिळण्याची सोय नव्हती. (ताजे, सकस, गरम, धारोष्ण)
२. अनेक शब्दांसाठी एक शब्द लिहा. (०१)
१. साखर घालून केलेला भात ______
२. पंधरा दिवसांचा समूह______
३. स्वमत (०३)
लेखकाने आपले आहार व्रत कसे चालू ठेवले होते ते तुमच्या शब्दांत लिहा. (०३)
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
“दोन महिन्यांत पन्नास पाैंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!’’ अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या 'कॅलरीज' मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती, त्यांनीच मला 'डाएटचा' सल्ला दिला. उदाहरणार्थ - सोकाजी त्रिलोकेकर. “तुला सांगतो मी पंत, 'डाएट' कर. बटाटा सोड. बटाट्याचं नाव काढू नकोस.” “हो! म्हणजे 'कुठं राहता?' म्हणून विचारलं तर नुसतं 'चाळीत राहतो' म्हणा. 'बटाट्याची चाळ' म्हणू नका. वजन वाढेल! खी: खी: खी:!” जनोबा रेगे या इसमाला काय म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय! पण सोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. “ए इडिअट! सगडयाच गोष्टींत जोक काय मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंत- तू बटाटा सोड.” |
1. कोण ते लिहा. (2)
- नेहमी तिरके बोलणारे - ______
- बटाटा सोडण्याचा सल्ला देणारे - ______
2. कृती पूर्ण करा. (2)
3. पंतांना उपासाबाबत मिळालेल्या विविध सल्ल्यांचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. (3)
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येताजाता ही माझी 'नाही ती भानगड' आहे, उगीच 'हात दाखवून अवलक्षण' आहे, 'पेललं नाही तेव्हा खाजगी झालं !' अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली; पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 'एकशे एक्क्याऐंशी पौंड.' रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे, या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. "घोरत तर असता रात्रभर!'' अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. "दोन महिन्यांत पन्नास पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा!'' अशी भीष्मप्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या 'कॅलरीज' मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी, की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. |
- उपोषणाची बातमी चाळीत जाहीर झाल्यावर कानांवर येणारी वाक्ये लिहा. (2)
- ______
- ______
- आकृतिबंध पूर्ण करा: (2)
- कार्डवर दाखवलेले वजन - ______
- स्वमत:
वजन कमी करण्यासाठी लेखकाने केलेले प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा. (3)