Advertisements
Advertisements
Question
आर्तवचक्र म्हणजे काय? आर्तवचक्राचे संक्षिप्त वर्णन करा.
Long Answer
Solution
- स्त्री-प्रजनन संस्थेत दर 28 – 30 दिवसांच्या कालावधीने होणाऱ्या बदलांच्या पुनरावृत्तीमुळे आर्तवचक्र सुरू राहते.
- पुटिका ग्रंथी संप्रेरक, पीतपिंडकारी संप्रेरक ही दोन पीयुषिकेतून सवणारी आणि इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही अंडाशयातून स्रवणारी संप्रेरके अशी चार संप्रेरके या चक्राचे नियंत्रण करतात.
- पुटिका ग्रंथी संप्रेरक च्या प्रभावामुळे अंडपेशीचा विकास होण्यास सुरुवात होते.
- ही विकसनशील पुटिका ‘इस्ट्रोजेन' संप्रेरक स्रवते.
- इस्ट्रोजन च्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तराची वाढ किंवा पुनर्निर्मिती होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये या पुटिका पूर्ण वाढ होते.
- पीतपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडमोचन होते. म्हणजेच पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते.
- अंडाशयामध्ये फुटलेल्या रिकाम्या पुटिका पासून प्रोजेस्टेरॉन निर्मिती करणारे पीतपिंड तयार होते.
- प्रोजेस्टेरॉन च्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्रवतात. या अंतःस्तरावर भ्रूणाचे रोपण होते.
- अंडपेशीचे फलन न झाल्यास पीतपिंडाचे रूपांतर श्वेतपिंडात होऊन इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकांचे स्रवणे बंद पडते.
- यामुळे गर्भाशयाच्या अंतःस्तराचा नास होतो. तेथील ऊती आणि अफलित अंडपेशी योनीमार्गाद्वारे रक्तस्रावाच्या रूपात बाहेर टाकली जाते. साधारणत: पाच दिवस हा रक्तस्राव सुरू राहतो. यालाच मासिक पाळी असे म्हणतात.
- स्त्री गरोदर नसेल तर रजोनिवृत्ती येईपर्यंत दरमहिन्याला असे आर्तवचक्र सुरू राहते.
shaalaa.com
मानवातील लैंगिक प्रजनन (Sexual reproduction in human being) - मानवी स्त्री-प्रजनन संस्था (Female Reproductive System)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
भिन्न पेशींच्या (युग्मकांच्या) संयोगाशिवाय ______ हे प्रजनन घडून येते.
नामनिर्देशित आकृती काढा.
मानवी स्त्री प्रजनन संस्था
नावे द्या.
स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्रवली जाणारी संप्रेरके.
स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी तिच्या अंडाशयात _____________ अंडपेशी असतात.
पुटिका ग्रंथी संप्रेरक : डिंबपेशीचा विकास : : पीतपिंडकारी संप्रेरक : _________
रोपण झाल्यापासून जन्म होईपर्यंत किती कालावधी लागतो?
पुढील अवयवांचे कार्य लिहा.
अपरा
शास्त्रीय कारणे लिहा.
जास्त वयाच्या स्त्रियांना होणाऱ्या अपत्यांना व्यंग असण्याची शक्यता जास्त असते.
शास्त्रीय कारणे लिहा.
45-50 वर्षांच्या दरम्यान स्त्रीला रजोनिवृत्ती येते.
आर्तवचक्र/ऋतुचक्र या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- आर्तवचक्रात रजोस्रावाचा काळ कधी असतो?
- अंडमोचन साधारण आर्तवचक्राच्या कोणत्या दिवसी होते?
- आर्तवचक्रात स्त्रीचे कोणते अवयव बदलत राहतात?
- आर्तवचक्रात गर्भाशयाच्या अंत:स्तराच्या पुननिर्मितीचा काळ कोणता?
- आर्तवचक्रात गर्भाशयाच्या अंत:स्तरातील ग्रंथी स्रवण्याचा काळ कोणता?