Advertisements
Advertisements
Question
शास्त्रीय कारणे लिहा.
जास्त वयाच्या स्त्रियांना होणाऱ्या अपत्यांना व्यंग असण्याची शक्यता जास्त असते.
Solution
- स्त्री भ्रूणामध्ये जन्माच्या वेळी अनेक दशलक्ष अपक्व अंडपेशी असतात; मात्र जन्मानंतर नवीन अंडपेशी तयार केल्या जात नाहीत.
- साधारणत: 45-50 वर्षांपर्यंत स्त्रीला रजोनिवृत्ती येते. म्हणजेच त्यावेळेपर्यंत वृद्धत्वामुळे अंडपेशींच्या फलनाची शक्यता कमी झालेली अंडी संख्येने फारच कमी असतात.
- त्यांची विभाजनाची क्षमता कमी झालेली असते. त्यामुळे, त्यात अर्धगुणसूत्री विभाजन योग्य प्रकारे पूर्ण होत नाही.
- अशा अंडपेशी जर फलित झाल्या, तर त्यापासून तयार होणारे अपत्य ही काही व्यंगांसहित (दोषयुक्त) (जसे की - डाऊन सिन्ड्रोम संलक्षण) जन्माला येण्याची दाट शक्यता असते.
म्हणूनच, जास्त वयाच्या स्त्रियांना होणाऱ्या अपत्यांना व्यंग असण्याची शक्यता जास्त असते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
भिन्न पेशींच्या (युग्मकांच्या) संयोगाशिवाय ______ हे प्रजनन घडून येते.
खालील कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून परिच्छेद पूर्ण करा.
(पितपिंडकारी संप्रेरक, गर्भाशयाचे अंतःस्तर, पुटिका ग्रंथी संप्रेरक, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरोन, पितपिंड)
अंडाशयातील पुटीकेची वाढ _______ संप्रेरकामुळे होते. ही पुटिका इस्ट्रोजेन स्त्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे ______ ची वाढ होते/ पुनर्निर्मिती होते. __________ संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटीकेच्या उर्वरित भागापासून ______ तयार होते. ते ______ व _______ ही संप्रेरके स्रवते. या संप्रेरकांच्या प्रभावाखाली ______च्या ग्रंथी स्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते.
स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी तिच्या अंडाशयात _____________ अंडपेशी असतात.
भ्रूणाचे रोपण ____________ या अवयवामध्ये होते.
गर्भवती माता आपल्या मुलाला ___________ या अवयवातून अन्नपुरवठा करतात.
साधारणपणे दरमहा अंडाशयातून ___________ अंडपेशीचे परिपक्वन होऊन तिचे अंडमोचन होते.
पुरुष प्रजननसंस्थेशी संबंधित विविध संप्रेरके.
रोपण झाल्यापासून जन्म होईपर्यंत किती कालावधी लागतो?
शास्त्रीय कारणे लिहा.
45-50 वर्षांच्या दरम्यान स्त्रीला रजोनिवृत्ती येते.
आर्तवचक्र/ऋतुचक्र या आकृतीचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- आर्तवचक्रात रजोस्रावाचा काळ कधी असतो?
- अंडमोचन साधारण आर्तवचक्राच्या कोणत्या दिवसी होते?
- आर्तवचक्रात स्त्रीचे कोणते अवयव बदलत राहतात?
- आर्तवचक्रात गर्भाशयाच्या अंत:स्तराच्या पुननिर्मितीचा काळ कोणता?
- आर्तवचक्रात गर्भाशयाच्या अंत:स्तरातील ग्रंथी स्रवण्याचा काळ कोणता?