Advertisements
Advertisements
Question
अभिव्यक्ती.
प्रस्तुत पाठ तुम्हांला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा.
Solution
पाठ्यपुस्तकात वेगवेगळे पाठ आहेत. त्यांपैकी 'दंतकथा' हा विनोदी पाठ मला खूप आवडला. पुन्हा पुन्हा वाचून मी आनंद घेतला. लेखक आहेत वसंत सबनीस.
वास्तविक दातदुखी हा अत्यंत वेदनादायक, माणसाला असहाय करणारा प्रसंग. त्या प्रसंगावर हा लेख आधारलेला आहे. मात्र लेखक त्या प्रसंगाकडे कारुण्यपूर्ण नजरेने न पाहता एका गमतीदार, खेळकर दृष्टीने पाहतात. घटनेकडे पाहण्याचा कोनच बदलल्यामुळे घटनेचे रूपच बदलून जाते. त्यामुळे माणसाच्या वागण्यातील हास्यास्पद, विसंगती अधिक ठळकपणे लक्षात येतात. हे बदललेले रूप लेखकांनी नर्मविनोदी शैलीत चित्रित केले आहे. प्रसंग खेळकर, तिरकस नजरेने पाहिल्यामुळे, नर्मविनोदी शब्दयोजनेमुळे वाचकाच्या चेहेऱ्यावर स्मित रेषा उमटतेच. कधी कधी वाचक खळखळून हसतो. लेखकांनी मनुष्यस्वभावाचे नमुने मार्मिकपणे टिपले आहेत. तसेच विसंगतीही वाचकांना हसवत हसवत दाखवून दिल्या आहेत. दातदुखीच्या वेळी वास्तवात घडणारे प्रसंग अतिशयोक्तीचा बहारदार वापर करीत वर्णिले आहेत. म्हणी-वाक्प्रचारांवर कोटी करून गमती साधलेल्या आहेत. शाब्दिक कोट्यांचा सुरेख वापर केला आहे. यांमुळे संपूर्ण लेख चुरचुरीत, वाचनीय झाला आहे.
एक-दोन उदाहरणे पाहू. लेखाच्या सुरुवातीलाच दाताची पंचमहाभूतांशी सांगड घातली आहे. पंचमहाभूते ही संपूर्ण विश्वाच्या रचनेतील मूलभूत तत्त्वे आहेत. तर दात हा एक माणसाचा सामान्य अवयव. या दाताला लेखकांनी सहावे महाभूत म्हटले आहे. अत्यंत सामान्य गोष्टी महान दर्जा दिल्यामुळे गमतीदार विरोधाभास निर्माण झाला. पुढच्याच परिच्छेदात, परमेश्वराला दाताची कल्पना सहा-सात महिन्यांनंतर सुचली असावी, असा लेखकांनी उल्लेख केला. हे वाचताक्षणी हसू येते. परमेश्वर सर्वशक्तिमान, परिपूर्ण. तरीही दातांची कल्पना उशिरा सुचल्याचे लिहून लेखकांनी ईश्वराला माणसाच्या जवळ आणले. त्यामुळे इथेही एक गमतीदार विरोधाभास निर्माण होतो.
भाषेतील निरीक्षणही बहारीचे आहे. दातासंबंधात एकही मंगलमय म्हण वा वाक्प्रचार मराठीत नाही. दातांवरून ज्या म्हणी-वाक्प्रचार आहेत, त्या दारिद्र्य, भिकारपणा व असभ्यपणा यांचा निर्देश करणाऱ्या आहेत. हा उल्लेख भाषेला खमंगपणा आणतो. 'दात पाहून प्रेयसीसाठी वेडा झालेला प्रियकर' अजून पाहिला नसल्याचे ते नमूद करतात.
या अशा उल्लेखांमुळे लेखाला खेळकरपणा चुरचुरीतपणा व गमतीदारपणा प्राप्त झाला आहे. कोणत्याही वाचकाला तो सहज आवडेल असा आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कारणे शोधा व लिहा.
लेखकाला दातांबद्दल अजिबात प्रेम नाही, कारण...
कारणे शोधा व लिहा.
दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये असे लेखकाला वाटते, कारण...
कृती करा.
दातांशी निगडित म्हणी व शब्दप्रयोग यांची लेखकाच्या मते वैशिष्ट्ये
कृती करा.
दातासंबंधीच्या लेखकाच्या कल्पना
कृती करा.
दात दुखताना लेखकाला होणारे साक्षात्कार
स्वभाववैशिष्ट्ये लिहा.
परशाची स्वभाववैशिष्ट्ये
स्वभाववैशिष्ट्ये लिहा.
लेखकाची स्वभाववैशिष्ट्ये
चौकटी पूर्ण करा.
लेखकाच्या मते सहावे महाभूत. ______
चौकटी पूर्ण करा.
लेखकाने दुखऱ्या दाताला दिलेली उपमा. ______
चौकटी पूर्ण करा.
ऐटीत चालणारा परशा म्हणजे जणू. ______
चौकटी पूर्ण करा.
लेखकाच्या मते जन्मात एकही दात न दुखणारा माणूस असा असतो. ______
चौकटी पूर्ण करा.
लेखकाच्या मते कवीने दाताला दिलेली उपमा. ______
स्वमत.
पाठातील विनोद निर्माण करणारी पाच वाक्ये शोधा. ती तुम्हांला का आवडली ते सकारण लिहा.
स्वमत.
लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळविक्राळ राक्षसाशी केलेली आहे, याबाबत तुमचे मत लिहा.
स्वमत.
लेखकाच्या दातदुखीबाबत शेजाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या संदर्भात एक छोटे टिपण तयार करा.
दिलेल्या उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, की दहा-बारा वर्षांपूर्वी दंतवैद्याबद्दलच्या खऱ्याखुऱ्या दंतकथा ऐकल्या होत्या, त्यावरून दंतवैद्याची खुर्ची, दात उपटण्याची क्रिया इत्यादी सर्व गोष्टींबद्दल माझ्या मनात विक्राळ भीती होती; पण प्रत्यक्षात तसे काही वाटले नाही. दंतवैद्य अलीकडे फारच माणसाळलेले आहेत असे माझे प्रामाणिक मत झाले. त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन देऊन इतका लीलया दात उपटला, की मी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलो! दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते. मी आजवर शत्रूंना आणि शेजाऱ्यांना भांडणाच्या वेळी ‘दात उपटून हातात ठेवीन’, ‘दात घशात घालीन’ अशा माझ्या शक्तीचे प्रदर्शन करणाऱ्या धमक्या दिल्या होत्या. त्यांना काहीच अर्थ नव्हता, याची हळहळ दंतवैद्याच्या खुर्चीत असतानाच वाटली. दंतवैद्याने दात दाखवला. हाच तो खलदंत! ज्याने माझे बायकोपुढे हसे केले तोच हा नीच दात. नतद्रष्ट! ‘तुला हेच शासन योग्य आहे’ असे मी उरलेले दातओठ खाऊन मनाशी म्हणालो. आता पुन्हा तो ठणका लागणार नाही, पुन्हा ते बोळे धरावे लागणार नाहीत. पुन्हा बायकोचा उपदेश ऐकावा लागणार नाही. ह्या विचारांनी मी आनंदाने बेहोश झालो. उरलेल्या दातांना धाक बसावा म्हणून तो काढलेला दात घरी नेण्याचा विचार मनात येऊन गेला; पण त्या दाताची संगतसुद्धा नको असे वाटून मी तो दंतवैद्यालाच अर्पण केला. आनंदाने घरी आलो. दारातूनच ओरडून चार-पाच शेजाऱ्यांना सांगितले, की ‘‘तो तुम्हांला जागवणारा दात गेला. यापुढे दंतसप्ताह नाही.’’ |
(१) (२)
(i)
(ii)
(२) दंतवैद्याने दात काढल्यानंतर लेखक आश्चर्यचकित का झाले? (२)
(३) स्वमत अभिव्यक्ती: (४)
लेखकाच्या मनातील दंतवैद्याविषयाची प्रतिक्रिया तुमच्या भाषेत लिहा.
किंवा
लेखकाने शेजाऱ्यांना ओरडून काय सांगितले? उदाहरणासह लिहा.
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) लेखकाने शक्तिप्रदर्शन करताना दिलेल्या धमक्या - (२)
(य) ______
(र) ______
(२) दंतवैद्याने केलेल्या दोन क्रिया - (२)
(य) ______
(र) ______
दंतवैद्य अलीकडे फारच माणसाळलेले आहेत असे माझे प्रामाणिक मत झाले. त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन देऊन इतका लीलया दात उपटला, की मी आश्चर्यचकित होऊन पाहतच राहिलो! दात उपटण्याची क्रिया इतकी सोपी असेल असे वाटले नव्हते. मी आजवर शत्रूंना आणि शेजाऱ्यांना भांडणाच्या वेळी ‘दात उपटून हातात ठेवीन’, ‘दात घशात घालीन’ अशा माझ्या शक्तीचे प्रदर्शन करणाऱ्या धमक्या दिल्या होत्या. त्यांना काहीच अर्थ नव्हता, याची हळहळ दंतवैद्याच्या खुर्चीत असतानाच वाटली. दंतवैद्याने दात दाखवला. हाच तो खलदंत! ज्याने माझे बायकोपुढे हसे केले तोच हा नीच दात. नतद्रष्ट! ‘तुला हेच शासन योग्य आहे’ असे मी उरलेले दातओठ खाऊन मनाशी म्हणालो. आता पुन्हा तो ठणका लागणार नाही, पुन्हा ते बोळे धरावे लागणार नाहीत. पुन्हा बायकोचा उपदेश ऐकावा लागणार नाही. ह्या विचारांनी मी आनंदाने बेहोश झालो. उरलेल्या दातांना धाक बसावा म्हणून तो काढलेला दात घरी नेण्याचा विचार मनात येऊन गेला; पण त्या दाताची संगतसुद्धा नको असे वाटून मी तो दंतवैद्यालाच अर्पण केला. आनंदाने घरी आलो. दारातूनच ओरडून चार-पाच शेजाऱ्यांना सांगितले, की ‘‘तो तुम्हांला जागवणारा दात गेला. यापुढे दंतसप्ताह नाही.’’ |
(३) स्वमत अभिव्यक्ती - (४)
‘यापुढे दंतसप्ताह नाही,’ लेखकाच्या या विधानाची कारणमीमांसा तुमच्या शब्दांत लिहा.
किंवा
दातदुखीच्या कथा-व्यथा सोदाहरण लिहा.
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
दात दुखायला लागला, की तो मुळापासून दुखू लागतो. किंबहुना दाताला मूळ असते हे फक्त तो दुखायला लागला म्हणजेच कळते. माझा दात जेव्हा दुखायला लागला तेव्हा तर माझी खात्रीच झाली, की आपण आरोग्यशास्त्राच्या पुस्तकात पाहिलेले दाताचे चित्र आणि प्रत्यक्ष आपले दात यांत फार फरक असला पाहिजे. आपल्या दाताला मूळ नसून झाडांसारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यांत सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत. नाहीतर सगळेच दात दुखत असल्याचा भास मला का व्हावा? प्रत्येक दाताला हात लावून पाहिल्यानंतर ज्या दाताने शंख करायला लावला, तो दुखरा दात याची खात्री झाली. दुखऱ्या दाताला लहानसा स्पर्शसुद्धा खपत नाही ! बरे, हे दुखणे तरी साधे, सरळ असावे? तेही नाही. एखाद्या कवीच्या मनातील जिप्सीसारखा एखादा लाकूडतोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एकघाव घालीत असतो. असे म्हणतात, की दिवसा सभ्य दिसणारी माणसे रात्री आपल्या खऱ्या रूपात फिरतात. दात हा अवयवही अशाच माणसांसारखा असावा. नाहीतरी दिवसा अधूनमधून पण सभ्यपणे दुखणारा दात रात्री राक्षसासारखा अक्राळविक्राळ का होतो? दातांत आणि चोरांत साम्य असते ते याच बाबतीत. दोघेही रात्री गडबड करतात. |
(१) जेव्हा दात दुखतो तेव्हा लेखकाला होणारे साक्षात्कार - (२)
(य) ______
(र) ______
(२) दुखऱ्या दाताबद्दलची लेखकाची मते: (२)
(य) ______
(र) ______
(३) स्वमत अभिव्यक्ती: (४)
लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळविक्राळ राक्षसाशी केलेली आहे, याबाबत तुमचे मत लिहा.
किंवा
दातदुखीच्या कथा-व्यथा तुमच्या शब्दांत लिहा.