Advertisements
Advertisements
Question
अभिव्यक्ती
'माणसापेक्षा माणुसकी फार फार मोठी आहे', या विधानातील आशयसौंदर्य तुमच्या शब्दांत लिहा.
Solution
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. म्हणून तो गट करून राहतो आणि असा गट करताना बहुतेक वेळा माणसे जातिधर्माच्या साहाय्याने एकत्र होतात. धर्मावरून एकमेकांना ओळखत, आपण वेगवेगळ्या धर्माना वेगवेगळे गुण चिकटवून टाकले आहेत. विशिष्ट धर्माचे लोक विशिष्ट स्वभावगुणांनीयुक्त असतात, असे आपण ठरवून टाकले आहे. माणसांचे हे वर्तन शतकानुशतके चालू आहे. लेखकांना माणसांची ही वृत्ती माहीत आहे.
या पाठातील मामूच्या सहवासाने समाजाची ही चूक ठळकपणे लेखकांच्या लक्षात येते. मामू हा धर्माने मुसलमान आहे. वाचकाला हे केवळ दोन-तीन तपशिलांतूनच कळते. त्याच्या पलीकडे मामूच्या वर्णनात कुठेही धर्माचा संबंध येत नाही. मामूचे संपूर्ण वागणेच धर्मनिरपेक्ष आहे. तो आणि इतर माणसे या सगळ्यांचे वागणे सारखेच आहे. मामू भोवतालच्या समाजामध्ये पूर्णपणे मिसळून गेला आहे. तो जाती-धर्माच्या पलीकडे गेला आहे. तो स्वत: कडे माणूस म्हणूनच पाहतो.
लेखकांना मामूचा दहा वर्षे सहवास लाभला आहे. या दहा वर्षात मामूचा साधेपणा, सरळपणा, निष्कपटपणा, सेवाभावीवृत्ती हे माणसामधले चांगले गुणच लेखकांच्या प्रत्ययाला आले आहेत. म्हणजे मामू हा आरपार सज्जन माणूस आहे.
शाळेत शिपाई म्हणून काम करताना त्याच्या मनात कधीही धर्माची भावना निर्माण झाली नाही. कोणत्याही सच्च्या भारतीयाप्रमाणे त्याचीही देशभक्ती प्रामाणिक आहे. शाळेतला मुलगा असो वा शिक्षक असो त्याच्याशी मामू धर्म न पाहता आत्मीयतेने वागतो. म्हणूनच जात- धर्माच्या पलीकडे जाऊन अनेक माणसांशी त्याचे आपुलकीचे संबंध निर्माण झाले आहेत; हे त्याच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी सिद्ध होते. माणसाने किती चांगले असावे याचे आदर्श उदाहरण म्हणजे मामू होय. मामूच्या उदाहरणावरून लेखकांना धर्मापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे, ही जाणीव मनात ठसून जाते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कोण ते लिहा.
सफेद दाढीतील केसाएवढ्या आठवणी असणारा:
कोण ते लिहा.
शाळेबाहेरचा बहुरूपी:
कोण ते लिहा.
अनघड, कोवळे कंठ :
कृती करा.
लेखकाने विदयार्थ्यांचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्द समूह :
कृती करा.
मामुची शाळाबाह्य रूपे :
खालील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा.
मामू सावधानचा पवित्रा घेऊन खडा होतो. ___________
खालील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा.
आईच्या आठवणी सांगताना मामूच्या डोळ्यांत पाणी येते. ___________
खालील वाक्यांतून तुम्हांला समजलेले मामूचे गुण लिहा.
मामू त्याला आईच्या मायेने धीर देत म्हणतो, ‘‘घाबरू नकोस. ताठ बस. काय झालं न्हाई तुला.’’ - ___________
खालील वाक्यातील तुम्हाला समजलेले मामूचे गुण लिहा.
माझ्याकडं कुणी बडा पाहुणा आला, की मामूकडं बघत नुसती मान डुलवली, की तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो. - ______
खालील वाक्यातील तुम्हाला समजलेले मामूचे गुण लिहा.
मामू एखादया कार्यक्रमात मुलांच्यासमोर दहा-वीस मिनिटे एखादया विषयावर बोलू शकतो. - ____________
खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.
थोराड घंटा
स्वमत.
'शाळेत तो शिपाई आहे; पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे', या मामूसंबंधी केलेल्या विधानाचा अर्थ पाठाधारे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
स्वमत.
मामूच्या संवेदनशीलतेची दोन उदाहरणे तुमच्या शब्दांत लिहा.
स्वमत.
मामूच्या व्यक्तित्वाचे (राहणीमान, रूप) चित्रण तुमच्या शब्दांत करा.
अभिव्यक्ती
'मामू' या पाठाची भाषिक वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
अभिव्यक्ती
मामूच्या स्वभावातील विविध पैलूंचे विश्लेषण करा.