Advertisements
Advertisements
Questions
अग्रहक्क भागांचे प्रकार सविस्तर स्पष्ट करा.
अग्रहक्क भागांचे प्रकार स्पष्ट करा.
Answer in Brief
Very Long Answer
Solution
- संचयी अग्रहक्क भाग: ज्या भागांना, न दिलेला लाभांश पूर्णतः देईपर्यंत संचित होत राहतो, त्यांना संचयी अग्रहक्क भाग असे म्हणतात. जर अपुऱ्या नफ्यामुळे कंपनी एक किंवा अधिक वर्षाचा लाभांश देऊ शकली नाही तर अशा लाभांशाची थकबाकी संचित होत जाते. जेव्हा कंपनी चांगला नफा कमावते, त्या वर्षी लाभांशाची थकबाकी भागधारकांना दिली जाते. समहक्कभागधारकांना लाभांश देण्यापूर्वीच ही थकबाकी अग्रहक्क भागांना दिली जाते. नियमावलीत वेगळी तरतूद नमूद केलेली नसल्यास कंपनीचे अग्रहक्क भाग हे ‘संचयी’ अग्रहक्कभाग असतात, पूर्णतः लाभांशाची थकबाकी दिली जात नाही तो पर्यंत अशी थकबाकी पुढील वर्षाकरिता अग्रेसीत (carry forward) होते.
- असंचयी अग्रहक्क भाग: या अग्रहक्क भागांवरील लाभांश संचित होत नाही. त्या वर्षीच्या नफ्यातूनच त्यांना लाभांश दिला जातो. जर कंपनीला एखाद्या वर्षी नफा झाला नाही तर असंचयी अग्रहक्क भागांना लाभांश मिळत नाही. प्रत्येक वर्षाच्या लाभांशाचा हिशोब त्या वर्षापुरताच ठेवला जातो. एखाद्या वर्षी जर कंपनी लाभांश देऊ शकली नाही तर त्या वर्षीच्या लाभांशाला कायमचे मुकतात.
- लाभभागी अग्रहक्क भाग: ज्या अग्रहक्क भागांना निश्चित लाभांश व्यतिरिक्त कंपनीच्या अतिरिक्त नफ्यामध्ये काही वाटा दिला जातो. अशा भागांना लाभभागी अग्रहक्क भाग असे म्हणतात. समहक्क भागधारकाला द्यावयाच्या लाभांशाची कमाल मर्यादा नियमावलीमध्ये नमूद केलेली असते. कमाल लाभांश त्यांना देऊन झाल्यावर जो वाटप योग्य नफा उरतो त्यातील वाटा मिळविण्यास लाभभागी अगहक्क भाग पात्र असतात.
- अलाभभागी अग्रहक्क भाग: जर कंपनीच्या नियमावलीमध्ये कोणतीही तरतूद नसेल तर सर्व अग्रहक्क भाग हे अलाभभागी अग्रहक्क भागच समजले जातात. अशा अग्रहक्क भागांचा लाभांशाचा दर भागविक्रीच्या शर्ती/अटींमध्ये नमूद केलेला असतो. अलाभभागी अग्रहक्क भाग हे फक्त निश्चित केलेला लाभांश मिळण्यासच पात्र असतात.
- परिवर्तनीय अग्रहक्क भाग: या अग्रहक्क भागांचे ठरावीक मुदतीनंतर समहक्क भागांमध्ये रूपांतर केले जाते.
- अपरिवर्तनीय अग्रहक्क भाग: अपरिवर्तनीय अग्रहक्क भागांना समहक्क भागांमध्ये रूपांतरित होण्याचा पर्याय उपलब्ध नसतो.
- परतफेडीचे अग्रहक्क भाग: परतफेडीच्या अग्रहक्क भागांना गुंतविलेले भांडवल ठरावीक मुदतीनंतर परत केले जाते. नियमावलीत तरतूद असेल तरच कंपनी अशाप्रकारच्या अग्रहक्कभागांचे वितरण करू शकतात. भांडवलाची परतफेड वाटप योग्य नफ्यातून किंवा नवीन समहक्क भागांच्या विक्रीतून आलेल्या पैशातून कंपनी करू शकते.
- न परत फेडीचे अग्रहक्क भाग: अशा अग्रहक्क भागांची परतफेड कंपनीच्या विसर्जनानंतरच केली जाते. कंपनी कायदा २०१३, कलम ५५ (१) नुसार कंपनी न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री करू शकत नाही.
shaalaa.com
मालकीच्या भांडवलाचे स्रोत - भाग
Is there an error in this question or solution?