Advertisements
Advertisements
Question
अग्रहक्क भाग म्हणजे काय?
Solution
अग्रहक्क भाग या भागांना काही विशेष सवलती व अग्रक्रमहक्क असतात. असे हक्क समहक्क भागांना नसतात. अग्रहक्क भागांचे विशेष हक्क असे आहेत.
- लाभांश देण्याच्या वेळी यांचा अग्रक्रमाने विचार केला जातो.
- कंपनी विसर्जनाच्या वेळी भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी यांचा अग्रक्रमाने विचार केला जातो.
अग्रहक्क भागधारकास लाभांश अग्रक्रमाने व निश्चित दराने दिला जातो. लाभांशाचा दर पूर्व निर्धारित असतो व तो विक्रीच्या वेळेस ठरविलेला असतो.
या भागधारकांना मतदानाचा सर्वसाधारण हक्क नसतो परंतु ज्या मुद्द्यांवरील निर्णयाचा अग्रहक्क भागधारकाच्या गुंतवणुकीवर थेट परिणाम होऊ शकतो अशा मुद्द्यांवर ते मतदान करू शकतात. उदाहरणार्थ त्यांच्या हक्कांमध्ये बदल केल्यास अथवा कंपनीची विक्री इत्यादी संदर्भात त्यांना मतदान करता येते.
अग्रहक्क भागधारक हे कंपनीचे सहमालक आहेत, पण ते कंपनीचे ‘नियंत्रक’ नाहीत. या प्रकारचे भाग जे गुंतवणूकदार सावध असतात ते खरेदी करतात कारण त्यांना त्यांच्या मुद्दलाची सुरक्षितता व नियमित लाभांश यांचीच काळजी असते.