Advertisements
Advertisements
Question
औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात उत्परिवर्तित प्रजातींचा वापर वाढला आहे.
Short Note
Solution
औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र या शास्त्रात जैव तंत्रज्ञानाच्या पद्धती वापरून अनेकविध फायदे देण्याच्या प्रजातींचा उपयोग करण्यात येतो. उत्परिवर्तित जाती आणि जनक अभियांत्रिकी बनवलेल्या प्रजाती वापरल्या की उत्पादनात भरीव वाढ होते. प्रतिजैविके, जीवनसत्त्वे, अमिनो आम्ले, विकरे अशा निरनिराळ्या उत्पादनांत उत्परिवर्तित प्रजातींचा वापर करता येतो. कचरा व्यवस्थापन व प्रदूषण नियंत्रण असे पर्यावरणाचे काही प्रश्न असे सूक्ष्मजीव वापरून सोडवले जातात. शेतीमध्ये देखील बी.टी. प्रकारच्या जाती याच पद्धतीने तयार केल्या जातात. या सर्व कारणांसाठी औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र उत्परिवर्तित प्रजातींचा वापर वाढला आहे.
shaalaa.com
औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र (Industrial microbiology)
Is there an error in this question or solution?