Advertisements
Advertisements
Questions
अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगाची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत हे लिहा.
मानवी शरीरातील कोणत्याही दोन अवशेषांगांचो नावे लिहा व ती अवशेषांगे ज्या प्राण्यांसाठी उपयुक्त आहेत त्यांची नावे लिहा. दोन उदाहरणे द्या.
Solution 1
- अवशेषांगे हे सजीवाच्या शरीरातील अवयव ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या अवस्थेत असून निरुपयोगी असतात.
- नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने ही इंद्रिये नाहीशी होण्याच्या मार्गाला लागलेली असतात; परंतु अशी निरुपयोगी इंद्रिये नाहीशी होण्यासाठी हजारो वर्षे लागतात.
- एका प्राण्याच्या शरीरात असणारी अवशेषांगे दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात उपयुक्त अशा अवयवांच्या स्वरूपात असतात. एका सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करीत नसला तरी दुसऱ्या सजीवात तो कार्यरत असतो.
- आंत्रपुच्छ हे मानवासाठी अवशेषांग आहे; कारण ते मानवी शरीरात निरुपयोगी असते. पण रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी ते आवश्यक व कार्यक्षम अवयव आहे.
- मानवाला अवशेषांगांच्या स्वरूपातील निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवू शकतात.
Solution 2
मानवाच्या शरीरात अंगावरील केस, कानांचे स्नायू इत्यादी अवशेष अवयव दिसून येतात.
- अंगावरील केस: इतर सस्तन प्राण्यांमध्ये हे थंडीपासून संरक्षणासाठी उपयोगी असतात.
- कानांचे स्नायू: माकड, ससा, गाय, घोडा यांसारख्या प्राण्यांमध्ये कान हलवण्यासाठी हे स्नायू उपयुक्त ठरतात.
RELATED QUESTIONS
खालील आकृती पूर्ण करा.
मानवी शरीरात आढळणारे ______ हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.
जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहित धरतात हे उदाहरणासह स्पष्ट करा.
वेगळा घटक ओळखा.
वेगळा घटक ओळखा.
वेगळा घटक ओळखा.
आंत्रपुच्छ : अवशेषांगे : : पेरीपॅटस : __________
मृत सजीवांच्या शरीरात C-12 चा ऱ्हास ही एकच प्रक्रिया सतत चालू असते.
अवशेषांगे म्हणजे काय?
मानवी शरीरातील अवशेषांगे इतर कोणत्याही प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत ते लिहा.