Advertisements
Advertisements
प्रश्न
अवशेषांगे म्हणजे काय हे सांगून मानवी शरीरातील काही अवशेषांगाची नावे लिहा व तीच अवशेषांगे इतर कोणत्या प्राण्यांसाठी कशी उपयुक्त आहेत हे लिहा.
मानवी शरीरातील कोणत्याही दोन अवशेषांगांचो नावे लिहा व ती अवशेषांगे ज्या प्राण्यांसाठी उपयुक्त आहेत त्यांची नावे लिहा. दोन उदाहरणे द्या.
उत्तर १
- अवशेषांगे हे सजीवाच्या शरीरातील अवयव ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या अवस्थेत असून निरुपयोगी असतात.
- नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने ही इंद्रिये नाहीशी होण्याच्या मार्गाला लागलेली असतात; परंतु अशी निरुपयोगी इंद्रिये नाहीशी होण्यासाठी हजारो वर्षे लागतात.
- एका प्राण्याच्या शरीरात असणारी अवशेषांगे दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात उपयुक्त अशा अवयवांच्या स्वरूपात असतात. एका सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करीत नसला तरी दुसऱ्या सजीवात तो कार्यरत असतो.
- आंत्रपुच्छ हे मानवासाठी अवशेषांग आहे; कारण ते मानवी शरीरात निरुपयोगी असते. पण रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी ते आवश्यक व कार्यक्षम अवयव आहे.
- मानवाला अवशेषांगांच्या स्वरूपातील निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवू शकतात.
उत्तर २
मानवाच्या शरीरात अंगावरील केस, कानांचे स्नायू इत्यादी अवशेष अवयव दिसून येतात.
- अंगावरील केस: इतर सस्तन प्राण्यांमध्ये हे थंडीपासून संरक्षणासाठी उपयोगी असतात.
- कानांचे स्नायू: माकड, ससा, गाय, घोडा यांसारख्या प्राण्यांमध्ये कान हलवण्यासाठी हे स्नायू उपयुक्त ठरतात.
संबंधित प्रश्न
खालील आकृती पूर्ण करा.
मानवी शरीरात आढळणारे ______ हे उत्क्रांतीचा अवशेषांगात्मक पुरावा होय.
प्रारंभिक अवस्थेतील साम्य यावरून __________ विषयक पुरावे दिसून येतात.
वेगळा घटक ओळखा.
वेगळा घटक ओळखा.
खालील आकृतीतील भागांना नावे द्या.
जोड्या लावा.
'अ' गट | 'ब' गट |
1) शरीरशास्त्रीय पुरावे | अ) माकडहाड व अक्कलदाढ |
2) पुराजीवविषयक पुरावे | ब) पानाचा आकार व शिराविन्यास |
क) जीवांचे अवशेष व ठसे |
शास्त्रीय कारणे लिहा.
पेरीपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे.
शास्त्रीय कारणे लिहा.
डकबिल प्लॅटिपस हा सस्तन प्राण्यांशी नाते सांगतो.
अवशेषांगे म्हणजे काय?