Advertisements
Advertisements
Question
बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना करावयाची तयारी तुमच्या शब्दांत लिहा.
Solution
वृत्तलेखाची प्रकृती बातमी वर आधारलेली असते. बातमी वस्तुनिष्ठ पुणे घटना सांगते. परंतु घटनेपलीकडचे दृश्य वृत्तलेखात चित्रित करायचे कौशल्यपूर्ण काम वृत्तलेखकाचे असते. एखाद्या घटनेत वेगळेपण असले तरच बातमी बनत असते. अशा बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना सर्वप्रथम बातमीचा विषय समजून घेणे अपेक्षित असते. बातमीतली घटना, तिचे अदृश्य दुवे शोधण्यासाठी बातमीतील घटनेचा सूक्ष्मपातळीवर विचार करावा लागेल. घटनेमागचे कारण आणि परिणाम यांची यथोचित सांगड घालून तटस्थपणे घटनेचा वेध घ्यावा लागेल. बातमीत छुप्या असणाऱ्या घटकांचा शोध घेऊन त्यावर प्रकाश टाकणे, पूरक मुद्दे अधोरेखित करणे अशा बाबींवर प्राधान्याने काम करावे लागेल. बातमीतील मुद्द्यांचे सुस्पष्ट भाषेत विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याने बातमीच्या परिघात येणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी संदर्भात तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे उचित ठरेल. बातमीतील तळ गाठून माहिती कागदावर आणली तर वाचकांची उत्सुकता शमवता येईल.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
वृत्तलेख म्हणजे काय ते स्पष्ट करा.
वृत्तलेखाचे प्रकार लिहून, कोणत्याही एका प्रकाराविषयी सविस्तर लिहा.
वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी लिहा.
थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाची गरज.
थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाचे स्रोत.
थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाची भाषा
थोडक्यात उत्तरे लिहा :
वृत्तलेखाची वैशिष्ट्य.
वर्तमानपत्रातील एखादा वृत्तलेख मिळवा आणि त्यात आढळलेली वैशिष्ट्ये लिहा
वृत्तलेखाची लेखनशैली कशी असावी? ते तुमच्या भाषेत लिहा.
वृत्तलेखाची कोणतीही पाच वैशिष्ट्ये लिहा.
त्यातील मजकूर ______ त्याची आकर्षकता ______ वृत्तलेखाची भाषा सोपी, वाचकांना समजणारी ______ आपलीशी वाटणारी ______ कमी शब्दांत अधिक आशय सांगणारी ______ वृत्तलेखाची भाषा वाचकाला खिळवून ठेवणारी.
‘मोठ्या अपघातात एका बालकाचे प्राण वाचले’ या विषयावर वृत्तलेखन करा.
‘वृत्तलेखन करत असताना वाचकांची अभिरुची लक्षात घ्यावी लागते’ तुमचे मत लिहा.
व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखाचा नमुना तयार करा.
वृत्तलेखाच्या भाषेची वैशिष्ट्ये लिहा.
खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी स्पष्ट करा.
वाचकांची अभिरूची ............. तात्कालिक महत्त्व ............. वेगळेपणा ............. वाचकांचे लक्ष वेधणे ............. वृत्तलेखाची शैली.
वृत्तलेखांचे प्रकार खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करा.
बातमीवर आधारित वृत्तलेख - व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख - मुलाखतीवर आधारित वृत्ललेख - ऐतिहासिक स्थळ - गूढ, विस्मय, नवल यांवर आधारित वृत्तलेख.