Advertisements
Advertisements
Question
भाग बाजाराची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
Explain
Solution
- प्रतिभूतींचा बाजार: भाग बाजार हे एक असे स्थान आहे जेथे सर्व प्रकारच्या कंपन्या, सरकारी, निमसरकारी प्रतिभूतींचा व्यवहार केला जातो.
- प्रतिभूतींचा पुनर्व्यवहार: भाग बाजारात कंपन्यांनी अगोदर विक्री केलेल्या प्रतिभूतींच्या खरेदी-विक्रीचे पुनर्व्यवहार होत असतात. अनेक गुंतवणूकदारांमध्ये आपल्याकडील प्रतिभूतींच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होतात.
- सूचिबद्ध केलेल्या प्रतिभूती: भाग बाजारात फक्त सूचिबद्ध केलेल्या/नोंदविलेल्या प्रतिभूतीचेंच व्यवहार करता येतात. सूचिबद्ध कंपन्यांची यादी गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करते; कारण अशा कंपन्यांना भाग बाजाराने ठरवून दिलेल्या कठोर नियमांचे काटेकोर पालन करावे लागते.
- संघटित आणि नियमन केलेला बाजार: भाग बाजारात सूचिबद्ध केलेल्या कंपन्यांना भाग बाजार व सेबीने ठरवून दिलेल्या नियमांचे, मार्गदर्शक सूचनांचे व कायद्याचे पालन करावे लागते.
- निश्चित स्थान: भाग बाजार ही विशिष्ट अशी भौतिक जागा आहे जेथे प्रतिभूतींचा व्यवहार केला जातो. ही एक अशी बाजारपेठ आहे जेथे दलाल व मध्यस्थ व्यवहार करण्यासाठी एकत्र येतात. आता भाग बाजारातील सर्व व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केले जातात.
- केवळ सदस्यांद्वारे व्यवहार: भाग बाजारातील प्रतिभूतींचे व्यवहार हे भाग बाजाराचे सदस्य किंवा अधिकृत दलाल यांच्या मार्फतच केले जाऊ शकतात.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?