Advertisements
Advertisements
Question
व्याजाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
Explain
Solution
अर्थ:
व्याज (Interest) म्हणजे कर्ज दिलेल्या किंवा गुंतवलेल्या रकमेवर ठराविक टक्केवारीने मिळणारा परतावा. व्याज ही कर्ज देणाऱ्याच्या कमाईचा एक निश्चित भाग असतो आणि विविध आर्थिक व्यवहारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो.
वैशिष्ट्ये:
- व्याज म्हणजे भांडवलाने दिलेल्या उत्पादित सेवांसाठी दिलेली किंमत होय.
- व्याजाचा थेट जोखमीशी संबंध आहे. जास्त जोखीम तेथे जास्त व्याज.
- व्याजदर हा मुद्दलाची वार्षिक टक्केवारी म्हणून व्यक्त केला जातो.
- पत पुरवठा, वित्तीय धोरण, कर्जाचे प्रमाण, चलनवाढीचा दर या बाबींद्वारे व्याज दर निश्चित केला जातो.
- नफा नसल्यासही कंपनीला व्याज द्यावेच लागते.
- व्याज हे निश्चित दराने दिले जाते. सामान्यत: पूर्ण-निर्धारित दरानुसार. जर कंपनीने जनतेकडून कर्जरोखे व ठेवीच्या स्वरूपात निधी गोळा केला असेल तर व्याज द्यावे लागते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?