Advertisements
Advertisements
Question
भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानाची तुलना करा.
Solution
भारत आणि ब्राझील या देशांमधील हवामानातील फरक पुढीलप्रमाणे आहे:
- भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते. याउलट, ब्राझील देशात उष्ण कटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते.
- सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते. याउलट, ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते.
- सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते.
याउलट, ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. - सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते. याउलट, ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
चूक की बरोबर ते लिहा. चुकीच विधान दुरुस्त करून लिहा:
भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात.
भौगोलिक कारणे लिहा:
भारतात अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात पडतो.
भौगोलिक कारणे लिहा:
ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळेही भारतात पाऊस पडतो.
दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानात होणारे बदल थोडक्यात सांगा.
भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा.
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
भारताचे स्थान उष्ण कटिबंधात आहे.
खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा.
भारतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना तापमानात घट होते.
खालील आलेखाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्यमानाचा आलेख
प्रश्न-
- चेन्नई व उर्वरित ठिकाणांच्या पर्जन्याच्या काळामध्ये तुम्हांला कोणता फरक आढळतो? का?
- दिल्ली व कोलकाता यांच्या तापमान चक्रात कोणते साम्य आढळते?
- चारही शहरांची सरासरी कमाल व किमान तापमान कक्षा काढा.
- कोणत्या शहराची तापमान कक्षा कमी आहे व त्यावरून कोणता अंदाज कराल?
- कोणत्या शहराची तापमान कक्षा जास्त आहे व त्यावरून हवामानाचा अंदाज करा.
- मुंबईचे तापमान व पर्जन्यमानाच्या आधारे हवामानाचा अंदाज करा.
तुम्हांस पुरवलेल्या भारताच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा, तसेच त्यांना नावे द्या व चिन्हांची सूची द्या.
- सिक्कीम
-
लक्षद्वीप बेटे
- चेन्नई बंदर
- आसाममधील खनिज तेलक्षेत्र-दिग्बोई
- दक्षिण भारतातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य
- कर्कवृत्त
वेगळा घटक ओळखा:
भारतातील अतिजास्त पर्जन्याचा प्रदेश
थोडक्यात टिपा लिहा.
परतीचा मान्सून