English

भारत व ब्राझील या देशांत चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

भारत व ब्राझील या देशांत चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य व फरक कोणते?

Answer in Brief

Solution

  • भारत ब्राझील या देशांत चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील साम्य:
  1. भारत व ब्राझील या देशांतील किनारपट्टीच्या भागात मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे.
  2. भारत व ब्राझील या दोन्ही देशांत खाऱ्या पाण्यातील मासेमारी केली जाते.
  • भारत ब्राझील या देशांत चालणाऱ्या मासेमारी व्यवसायातील फरक:
  1. भारतात ठिकठिकाणी नद्या, तळी, सरोवरे इत्यादी ठिकाणी गोड्या पाण्यातील मासेमारी केली जाते. परंतु, ब्राझीलमध्ये प्राकृतिक रचना, घनदाट जंगले, नद्यांच्या पाण्याचा वेग यांमुळे गोड्या पाण्यातील मासेमारी विकसित झालेली नाही.
  2. ब्राझीलजवळ उष्ण व सागरी प्रवाह एकत्र येतात. प्रवाहांच्या संगमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्लवक वाढते. प्लवक हे माशांचे खाद्य असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासे आढळतात. परिणामी, ब्राझीलमध्ये मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे. याउलट, भारताजवळ अशा प्रकारे सागरी प्रवाह एकत्र येत नसूनही इतर अनुकूल घटकांमुळे भारतात मासेमारी व्यवसाय विकसित झाला आहे.
shaalaa.com
भारतामधील आर्थिक व्यवसाय
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: अर्थव्यवस्था आणि व्यवसाय - स्वाध्याय [Page 60]

APPEARS IN

Balbharati Geography (Social Science) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
स्वाध्याय | Q २. (आ) | Page 60
SCERT Maharashtra Geography [Marathi] 10 Standard SSC
Chapter 8 अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×