Advertisements
Advertisements
Question
भौगोलिक कारणे लिहा.
भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्य व्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे.
Give Reasons
Solution
-
भारत हा सागरी आणि अंतर्देशीय अशा दोन्ही प्रकारच्या माशांच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे. मत्स्यव्यवसाय अन्न पुरवठा वाढविण्यात, रोजगार निर्मिती, पोषण पातळी वाढविण्यात आणि परकीय चलन मिळविण्यात मदत करतात.
- केरळ, पश्चिम बंगाल, ओरिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात राहणाऱ्या अनेक लोकांच्या आहारात मासे हा महत्त्वाचा भाग आहे. भारताला सुमारे ७५०० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. या किनाऱ्यालगत मासेमारी केली जाते.
- मासेमारीच्या एकूण वार्षिक उत्पादनापैकी सागरी मासेमारीचा वाटा जवळपास ४०% आहे. वशी, बांगडा, बोंबील, सुरमई, पापलेट, झिंगे इत्यादी जलचर अरबी समुद्रात आढळतात. बंगालच्या उपसागरात शेवंडे, लबी चकई (क्लूपिडूस), रावस इत्यादी जलचर आढळतात.
- गोड्या पाण्यातील मत्स्यपालन नद्या, कालवे, जलाशय, तलाव इत्यादींमध्ये चालते. कटला, रोहू, चोपडा इत्यादी गोड्या पाण्यातील प्रमुख मासे आहेत. देशाच्या एकूण मत्स्यव्यवसायापैकी सुमारे ६०% वार्षिक उत्पादन गोड्या पाण्यातील मासेमारीतून मिळते.
shaalaa.com
भारतामधील आर्थिक व्यवसाय
Is there an error in this question or solution?