Advertisements
Advertisements
Question
भौगोलिक कारणे लिहा.
ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.
Short Note
Solution
- पांढऱ्याशुभ्र वाळूच्या पुळणी, स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, ॲमेझॉन नदी खोऱ्यातील सदाहरित घनदाट अरण्ये, प्राण्यांच्या व पक्ष्यांच्या विविध प्रजाती, विविध उद्याने इत्यादी आकर्षणांमुळे ब्राझीलमधील पर्यटन व्यवसायाचा जलद गतीने विकास होत आहे.
- पर्यटन व्यवसायातील वाढीमुळे निर्माण होणारे प्रदूषण, पर्यावरणास होणारी हानी इत्यादी दुष्परिणाम रोखणे अत्यावश्यक आहे.
- पर्यावरणस्नेही पर्यटनाच्या विकासाने पर्यटन व्यवसायास अधिक चालना देणे व पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवणे शक्य होणार आहे.
म्हणून, ब्राझीलमध्ये पर्यावरणस्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे.
shaalaa.com
ब्राझीलमधील पर्यटन स्थळे
Is there an error in this question or solution?