English

भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Questions

भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा.

फरक स्पष्ट करा.

भारत प्राकृतिक रचना व ब्रझील प्राकृतिक रचना

Answer in Brief
Distinguish Between

Solution 1

  1. भारताच्या प्राकृतिक रचनेचे प्रामुख्याने हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह हे पाच विभाग केले जातात. याउलट, ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचे उच्चभूमी, अजस्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह पाच प्राकृतिक विभाग केले जातात.
  2. भारतात विविध भागांत उंच पर्वत आढळतात. याउलट, ब्राझीलमध्ये उंच पर्वत आढळत नाहीत.
  3. भारताच्या उत्तर भागात हिमालयाचा पर्वतीय प्रदेश आहे. भारताच्या दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भागात पश्चिम घाट व पूर्व घाट हे पर्वतीय प्रदेश आहेत.
  4. भारतातील पर्वतीय प्रदेशाच्या सर्वोच्च उंचीची कक्षा ७००० मीटर ते ८००० मीटर आहे. याउलट, ब्राझील देशातील उच्चभूमीच्या सर्वोच्च उंचीची कक्षा १००० मीटर ते २००० मीटर आहे.
  5. भारतात उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात थरचे वाळवंट आहे. याउलट ब्राझीलमध्ये अशा स्वरूपाचा उष्ण वाळवंटी प्रदेश नाही.
  6. भारताच्या उत्तर भागात विस्तीर्ण मैदाने आढळतात. याउलट ब्राझीलमध्ये अशा स्वरूपाची विस्तीर्ण मैदाने आढळत नाहीत.
  7. भारतात किनारपट्टीच्या भागात विविध पश्चजलाचे प्रदेश आढळतात. असे प्रदेश ब्राझील देशात आढळत नाहीत.
  8. ब्राझीलमध्ये अजस्र कडा आढळतो. ब्राझीलच्या उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित होते. याउलट, भारतात पठारांची सीमा अंकित करणारे अशा स्वरूपाचे अजस्र कडे आढळत नाहीत.
shaalaa.com

Solution 2

  भारत ब्रझील
1. पर्वतीय प्रदेश भारताच्या उत्तरेला सर्वाधिक उंचीचा हिमालय पर्वतरांगांचा प्रदेश असून 'के-२' हे सर्वाधिक उंचीचे शिखर (उंची ८६८१ मी) आहे. या पर्वतरांगा पश्चिमेकडून पूर्वेकडे पसरल्या आहेत. भारतीय द्वीपकल्पीय प्रदेशाच्या दोन्ही बाजूला डोंगर असून त्यांना पूर्व आणि पश्चिम घाट म्हणून ओळखले जाते. ब्रझीलमध्ये पर्वतीय प्रदेश नाही; दक्षिण ब्रझील विस्तीर्ण अशा पठाराने व्यापला आहे; मात्र उत्तरेकडे गियाना उच्चभूमीवर ब्रझीलमधील सर्वोच्च शिखर 'पिको दी नेब्लीना' (उंची ३०१४ मी) आहे.
2. मैदानी प्रदेश भारतात उत्तरेला हिमालयाचा पायथा ते भारतीय द्वीपकल्पापर्यंत सपाट व सुपीक प्रदेश आहे. हा प्रदेश पश्चिमेकडे राजस्थान-पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरलेला असून या प्रदेशाचा उतार सर्वसाधारणपणे पूर्व दिशेने आहे. सुंदरबन हा जगातील सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश गंगा नदीच्या मुखाजवळ आहे. ब्रझीलमध्ये मैदानी प्रदेश उत्तरेकडील ॲमेझॉन खोर्याचा भाग आणि नैऋत्येकडील पॅराना, पॅराग्वे नद्यांचा भाग या दोन विभागांत दिसून येतो. ॲमेझॉन नदी खोऱ्याचा प्रदेश हा विस्तीर्ण मैदानी प्रदेश असून याचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे. ॲमेझॉन खोरे ब्रझीलच्या पश्चिम भागात खूप रुंद (१३०० किमी) आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यातील वने उष्ण कटिबंधीय वर्षावने आहेत.
3. पठारी प्रदेश उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. यांत अनेक पठारांची शृंखला व डोंगररांगा आहेत. यांत उत्तरेकडील अरवली हा सर्वांत प्राचीन वली पर्वत आहे. या भागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला, मध्यभागातील विंध्य-सातपुडा पर्वत, तर पश्चिम घाट व पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत. ब्रझीलमध्ये दक्षिणेकडे प्रामुख्याने विस्तीर्ण पठारी प्रदेश असून हा ब्रझीलची उच्चभूमी किंवा ढालक्षेत्र म्हणून ओळखला जातो.
4. किनारी प्रदेश भारताच्या पश्चिम, दक्षिण व पूर्व दिशेने अनुक्रमे अरबी समुद्र, हिंदी महासागर व बंगालचा उपसागर हे विस्तीर्ण जलाशय आहेत. भारतीय किनारपट्टीचे पूर्व व पश्चिम किनारपट्टी असे दोन भाग पडतात आणि पश्चिम किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी यांच्यात विषमता आढळते. ब्रझीलला उत्तरेकडे उत्तर अटलांटिक महासागर व पूर्व व आग्नेयकडे दक्षिण अटलांटिक महासागराचा विस्तीर्ण किनारा लाभला आहे. उत्तरेकडील किनारी भाग सखल असून येथे अनेक बेटे आहेत, तर पूर्व किनारीभागात अनेक पुळणे आहेत.
5. द्वीपसमूह अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप व बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान व निकोबार हे मोठे द्वीपसमूह आहेत. लक्षद्वीप बेटे प्रवाळाची कंकणद्वीपे आहेत, तर बंगालच्या उपसागरातील अंदमान-निकोबार बेटे ही ज्वालामुखीय बेटे आहेत. माराजॉ हे मोठे किनारी बेट ब्रझीलच्या उत्तर किनाऱ्यावर आहे.
shaalaa.com
भारताची प्राकृतिक रचना
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: प्राकृतिक रचना व जलप्रणाली - स्वाध्याय [Page 23]

APPEARS IN

Balbharati Geography (Social Science) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली
स्वाध्याय | Q २. (अ) | Page 23
SCERT Maharashtra Geography [Marathi] 10 Standard SSC
Chapter 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. | Q 1
SCERT Maharashtra Geography [Marathi] 10 Standard SSC
Chapter 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली
फरक स्पष्ट करा. | Q 1

RELATED QUESTIONS

अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

अरवली पर्वताच्या पायथ्याशी ________. 


भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती?


टिपा लिहा.

हिमालय


भौगोलिक कारणे लिहा.

भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते.


भौगोलिक कारणे लिहा.

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.


अचूक गट ओळखा:

भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमवार आढळतात.


फरक स्पष्ट करा.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेश व ब्रझील मैदानी प्रदेश


विधानावरून प्रकार ओळखा.

भारतातील हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे.


खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न-

  1. विंध्य पर्वत कोणत्या नदीखोऱ्यांचा जलविभाजक आहे?
  2. द्वीपकल्पावरील दक्षिणवाहिनी नदीचे नाव काय आहे?
  3. अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारांदरम्यान असलेल्या पठारांची नावे लिहा.
  4. पूर्व घाटातील शिखराचे नाव सांगा.
  5. सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×