English

फरक स्पष्ट करा. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश व ब्रझील मैदानी प्रदेश - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

फरक स्पष्ट करा.

उत्तर भारतीय मैदानी प्रदेश व ब्रझील मैदानी प्रदेश

Distinguish Between

Solution

  भारतीय मैदानी प्रदेश ब्रझील मैदानी प्रदेश
1.  भारतीय मैदानी प्रदेश गंगेचे मैदान व गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदी प्रणालीचा त्रिभुज प्रदेश या दोन प्रदेशांत विभागला गेला आहे. ब्रझीलमध्ये मैदानी प्रदेश उत्तरेकडील ॲमेझॉन खोऱ्याचा भाग आणि नैऋत्येकडील पॅराना, पॅराग्वे नद्यांचा भाग या दोन विभागांत दिसून येतो.
2.  उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचा विस्तार हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत, तसेच पश्चिमेकडे राजस्थान-पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत आहे. ॲमेझॉनचा मैदानी प्रदेश गियाना उच्चभूमी व ब्रझील उच्चभूमी दरम्यान आढळतो.
3.  भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग आणि बांग्लादेश मिळून गंगा व ब्रह्मपुत्रा नदी प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो. या प्रदेशाचे नाव सुंदरबन आहे. हा जगातील सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश आहे. उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हे थरचे वाळवंट किंवा मरुस्थली या नावाने प्रसिद्ध आहे. ॲमेझॉनच्या खोऱ्यातील वने उष्ण कटिबंधीय वर्षावने आहेत. पँटानल हा जगातील उष्णकटिंबधीय पाणथळ भूमींपैकी एक प्रदेश आहे.
4. या प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. वारंवार येणारे पूल आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यांमुळे हा मैदानी प्रदेश खूप दुर्गम बनला आहे.
shaalaa.com
भारताची प्राकृतिक रचना
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: प्राकृतिक रचना व जलप्रणाली - फरक स्पष्ट करा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Geography [Marathi] 10 Standard SSC
Chapter 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली
फरक स्पष्ट करा. | Q 2

RELATED QUESTIONS

अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.

अरवली पर्वताच्या पायथ्याशी ________. 


भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा.


भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती?


टिपा लिहा.

हिमालय


भौगोलिक कारणे लिहा.

भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते.


भौगोलिक कारणे लिहा.

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत.


अचूक गट ओळखा:

भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खालील पठारे क्रमवार आढळतात.


विधानावरून प्रकार ओळखा.

भारतातील हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे.


खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न-

  1. विंध्य पर्वत कोणत्या नदीखोऱ्यांचा जलविभाजक आहे?
  2. द्वीपकल्पावरील दक्षिणवाहिनी नदीचे नाव काय आहे?
  3. अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारांदरम्यान असलेल्या पठारांची नावे लिहा.
  4. पूर्व घाटातील शिखराचे नाव सांगा.
  5. सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते?

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×