English

भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

भारताचा सर्वाधिक भाग पानझडी वनांनी का व्यापला आहे?

Answer in Brief

Solution

  1. पर्जन्यमान आणि हवामान हे वनस्पती जीवनावर परिणाम करणारे मुख्य घटक आहेत.
  2. भारत हा उष्ण कटिबंधीय देश असून भारतात मान्सून प्रकारचे हवामान आहे. देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत पाऊस पडतो.
  3. भारताचे एकूणच हवामान वर्षभर उष्ण असते. या नैसर्गिक स्थितीमध्ये पानझडी वृक्ष अधिक जास्त प्रकारे अनुकूलन साधतात. ज्या प्रदेशात १००० ते २००० मिमी दरम्यान पर्जन्यामान आहे. तेथे पानझडी वृक्ष आढळतात.
  4. कोरड्या ऋतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये, म्हणून या वनांतील वृक्ष पाने गाळतात. त्यामुळे, भारताचे हवामान आणि पर्जन्यमान यांच्याशी जुळवून घेणाऱ्या साग, बांबू, वड, पिंपळ इत्यादी पानझडी वनस्पती येथे अधिक प्रमाणात आढळतात.
    याचाच अर्थ, भारतात सर्वाधिक भाग पानझडी वनांनी व्यापला आहे.
shaalaa.com
भारत-वनस्पती
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: नैसर्गि क वनस्पती व प्राणी - स्वाध्याय [Page 37]

APPEARS IN

Balbharati Geography (Social Science) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 5 नैसर्गि क वनस्पती व प्राणी
स्वाध्याय | Q ४. (उ) | Page 37
SCERT Maharashtra Geography [Marathi] 10 Standard SSC
Chapter 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. | Q 4
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×