Advertisements
Advertisements
Question
भारतातील डाव्यांचा उग्रवाद महणजे काय?
Solution
(१) नक्षलवादी चळवळ जी माओवादी चळवळ अथवा डाव्यांची उग्रवादी चळवळ म्हणूनही ओळखली जाते.
(२) तिला शेतमजूर, दलित आणि आदिवासी लोकांचे समर्थन आहे. तो चळवळ शहरी भागात विशेषतः कामगार वर्गात पसरली आहे.
(३) जिथे अन्याय, शोषण, दमन आणि राज्याकडून दुर्लक्षिले गेल्याची भावना असते, तेथे ही चळवळ यशस्वी होते.
(४) या चळवळीचा प्रसार बिहार, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांत झाला.
(५) सन २००४ मध्ये वेगवेगळ्या नक्षलवादी गटांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या पक्षाची स्थापना केली.
(६) कार्ल मार्क्स, लेनिन आणि माओ-त्से-तुंग यांच्या वैचारिक बैठकीच्या आधारे कार्य करणारी ही जहाल-उग्रवादी संघटना आहे.सशस्त्र बंडाच्या मार्गाने लोकशाही शासन उलथवून पाडण्यासाठी या संघटना प्रयत्नशील असल्याने त्यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आले असून त्यांच्या कारवायांना प्रतिबंध करण्यात आला आहे.