Advertisements
Advertisements
Question
शांतता, स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते.
Answer in Brief
Solution
राष्ट्राच्या प्रगतीसाठी शांतता व स्थैर्य यांची गरज असते,या विधानाशी मी सहमत आहे.
कारणे: (१) कामगार व विदयार्थी वर्गाची आंदोलने, शेतकऱ्यांचे लढे, जातीय दंगली व जातीय हिंसाचारामुळे अराजकसदृश परिस्थिती निर्माण होते.
(२) या समस्या/आंदोलने आटोक्यात आणण्यासाठी शासनाचा वेळ खर्ची पडतो, तसेच आंदोलनांच्या काळात सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होते.
(३) दुर्मीळ असलेली साधनसंपत्ती अनुत्पादक उपक्रमांवर खर्च करावी लागते. त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीत खंड पडतो.
(४) देशाची आर्थिक प्रगती होण्यासाठी सर्व समाजघटकांनी संयम बाळगणे आणि सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. त्यामुळे देशात शांतता व स्थैर्य वाढेल आणि देशाची प्रगती होईल.
shaalaa.com
राज्याची भूमिका
Is there an error in this question or solution?