- अमेझॉन नदीचे खोरे विषुववृत्तीय प्रदेशात स्थित असल्यामुळे तेथे वर्षभर पाऊस पडतो. यामुळे, तेथे घनदाट विषुववृत्तीय वनांचा विस्तार आहे, परंतु तेथील गरम आणि आर्द्र हवामान मानवी वस्तीस अनुकूल नाही.
- परिणामी, तेथील साधनसंपत्तीचा शोध आणि उपयोग यावर निसर्गत:च काही मर्यादा आहेत.
- वर्षभर पाऊस पडत असल्यामुळे तेथे दलदलीचे क्षेत्र तयार झाले आहे, ज्यामुळे वाहतुकीसाठी सोयींचा विकास मर्यादित आहे.
या सर्व कारणांमुळे, ब्राझीलच्या किनाऱ्यापासून अमेझॉन नदीच्या खोऱ्यात असलेल्या अंतर्गत प्रदेशात जात असताना मानवी वस्त्या अधिक विरळ होत जातात.