Advertisements
Advertisements
Question
'बहिणाबाईंचे साहित्य जुन्यात चमकणारे व नव्यात झळकणारे आहे,' हे लेखकाचे विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Solution
अत्रे यांनी बहिणाबाईंच्या कविता वाचल्या आणि ते प्रचंड प्रभावित झाले. 'स्मृतिचित्रे' या साहित्यकृती इतकी ती श्रेष्ठ साहित्यकृती आहे, असे त्यांचे मत झाले. बहिणाबाईंची प्रतिभा त्यांच्या कवितेतल्या शब्दाशब्दांतून पाझरत राहते. इतके सोज्वळ, इतके निर्मळ काव्य मराठी साहित्यात क्वचितच दिसते, असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. बहिणाबाई या निरक्षर, अशिक्षित होत्या. मग त्यांना उत्तम काव्य लिहिता कसे येईल ? असा प्रश्न काही जणांना पडू शकतो. त्याचे उत्तर लेखकांनी देऊन टाकले आहे. शिक्षण आणि प्रतिभाशक्ती यांचा काडीइतकाही संबंध नाही. बहिणाबाईंच्या काव्यावरून हे स्पष्टपणे दिसून येते. त्या ग्रामीण भागात राहत होत्या. घरकाम आणि शेतीकाम यांपलीकडे त्यांना काहीही येत नव्हते. तरीही त्यांनी श्रेष्ठ दर्जाचे काव्य निर्माण केले.
बहिणाबाई अशिक्षित होत्या आणि त्यांना फक्त बोलीभाषाच येत होती, म्हणून त्यांचे काव्य जुन्यांच्या रांगेत बसवले तरी ते चमकून उठते. बरे, त्यांचे काव्य आधुनिकांच्या रांगेत ठेवले, तरी तेथेही ते झळाळून उठते; इतका त्यांच्या काव्याचा दर्जा उच्च आहे. त्यांना माणसांच्या साध्या कृतीतून, वागण्यातून माणसाच्या स्वभावातील, त्याच्या प्रवृत्तीतील विपरीतता दिसून येते. निसर्गातील साध्या साध्या घटकांच्या दर्शनातून त्यांना परमेश्वराचे दर्शन घडते. त्यांच्या काव्याचे या सामर्थ्यामुळे वाचकाला नैतिक मार्गदर्शन मिळते. म्हणूनच बहिणाबाईंचे काव्य नव्या जुन्या सर्व प्रकारच्या काव्यांमध्ये स्वतःच्या तेजाने झळाळून उठते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
कृती करा.
कृती करा.
बहिणाबाई यांच्या काव्याचे विशेष
कृती करा.
अमर काव्य जन्माला येण्याची लेखकाने सांगितलेली लक्षणे
तुलना करा.
मुद्दे | माणूस | प्राणी |
वर्तणूक | ||
इमानिपणा |
खालील घटनांचे पाठाच्या आधारे परिणाम लिहा.
घटना | परिणाम |
(१) कोकिळ पक्ष्याने तोंड उघडणे. | ______ |
(२) प्राजक्ताची कळी उमलणे. | ______ |
(३) जातीच्या कवीचे हृदय ताल धरून बसलेला असणे. | ______ |
खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा.
शब्दांची मौज वाटेल, अशी बहिणाबाईंनी दिलेली उदाहरणे -
खालील आशयाची कवितेची उदाहरणे पाठातून शोधून लिहा.
बहिणाबाई प्राणिमात्रांविषयीची कृतज्ञता -
'बहिणाबाई शेताला निघाल्या, की काव्य आपले निघालेच त्यांच्याबरोबर,' या विधानाचा तुम्हांला समजलेला अर्थ सविस्तर लिहा.
'मानसा मानसा, कधी व्हशीन मानूस!' या उद्गारातून व्यक्त झालेला बहिणाबाईंचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.