Advertisements
Advertisements
Question
बलाच्या दिशेच्या 30° कोनांत विस्थापन झाले असता केलेल्या कार्याचे समीकरण काढा.
Solution
समजा, O या बिंदूशी असलेल्या एका वस्तूवर `vecF` हे स्थिर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे `vecs` एवढे विस्थापन होते व बल आणि विस्थापन यांच्यामधील कोन 0 आहे.
वस्तूचे विस्थापन O →P, बलाची दिशा O →Q
आकृतीवरून,
`costheta = ("OR")/("OQ")`
∴ OR = OQ cosθ
= F cosθ
येथे विस्थापनाच्या दिशेत वस्तूवर क्रिया करणारे बल = F cosθ
∴ बलाने वस्तूवर केलेले कार्य = (F cosθ)s = Fs cosθ
वस्तूचे विस्थापन O →P, बलाची दिशा O →Q
`cos theta = ("OS")/("OP")`
∴ OS = OP cosθ = s cosθ
येथे बलाच्या दिशेत वस्तूचे विस्थापन = s cosθ
∴ बलाने वस्तूवर केलेले कार्य = F(s cosθ) = Fs cosθ
θ = 30° असल्यास कार्य (W) = Fs cos 30°
= Fs`sqrt3/2`
APPEARS IN
RELATED QUESTIONS
रवीने एका पुस्तकाला 10 N इतके बल लावले असता त्या पुस्तकाचे बलाच्या दिशेने 30 सेंमी इतके विस्थापन झाले तर रवीने केलेले कार्य काढा.
एका मोटारीचा वेग 54 km/hr पासून 72 km/hr झाला. जर मोटारीचे वस्तुमान 1500 kg असेल तर वेग वाढविण्यासाठी किती कार्य करावे लागेल ते सांगा.
वर्तुळाकार गतीत फिरत असलेल्या वस्तूचे कार्य शून्य का असते?
खालील पर्यायातून एक वा अनेक अचूक पर्याय निवडा.
ज्यूल हे एकक ______ चे आहे.
- बल
- कार्य
- शक्ती
- ऊर्जा
खालील पर्यायातून एक वा अनेक अचूक पर्याय निवडा.
कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा ______ व्हावी लागते.
- स्थानांतरित
- अभिसारित
- रूपांतरित
- नष्ट
विधानाखालील योग्य पर्याय निवडून पुढील विधान स्पष्टीकरणासह लिहा.
वस्तूवर घडून येणारे कार्य ______ वर अवलंबून नसते.