Advertisements
Advertisements
Question
ब्राझील व भारतातील नैसर्गिक वनप्रकारांतील फरक सांगा.
Distinguish Between
Short Note
Solution 1
ब्राझील व भारतातील नैसर्गिक वनप्रकारांतील फरक पुढीलप्रमाणे आहे.
- वर्षावने:
- ब्राझील देशाच्या विषुववृत्ताजवळील उत्तर भागात वर्षभर भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश पडतो. त्यामुळे ब्राझीलच्या उत्तर भागात घनदाट व सदाहरित वर्षावने आढळतात.
- भारताचे स्थान विषुववृत्तापासून लांब आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये आढळणारी वर्षावने भारतात आढळत नाहीत.
- हिमालयीन वने:
- भारताच्या उत्तर भागात हिमालय पर्वतरांगांत अतिउंच प्रदेशांत हंगामी फुलझाडे असणारी वने, मध्यम उंचीवरील प्रदेशांत पाईन, देवदार, फर, स्प्रूस अशा सूचिपर्णी वृक्षांची वने व पायथ्यालगत मिश्र वने आढळतात.
- ब्राझील देशात अतिउंच व बर्फाच्छादित पर्वत आढळत नाहीत.
त्यामुळे भारतात आढळणारी हिमालयीन वने ब्राझीलमध्ये आढळत नाहीत.
shaalaa.com
Solution 2
भारत | ब्राझील | |
1. | प्रामुख्याने आढळणारा वन प्रकार | |
भारतात १००० मिमी ते २००० मिमी पर्जन्याच्या प्रदेशात प्रामुख्याने पानझडी वने सर्वाधिक प्रमाणात आढळतात. | ब्राझीलच्या विषुववृत्तीय प्रदेशांत बहुतांश भागात वर्षभर पाऊस (सरासरी २००० मिमी) पडतो. त्यामुळे, ब्राझीलमध्ये प्रामुख्याने विषुववृत्तीय वने सर्वाधिक प्रमाणात आढळतात. | |
2. | सूचीपर्णी वृक्षांची वने | |
भारतीय हिमालयात, मध्यम उंचीच्या प्रदेशात सूचीपर्णी वृक्षांची वने आढळतात. उदा. पाइन, देवधर, फर आणि पायथ्यालगत मिश्र वने आढळतात. | ब्राझीलमध्ये सूचीपर्णी वने आढळत नाहीत. | |
3. | उष्ण कटिबंधीय सदाहरित वने | |
भारतात पश्चिम व ईशान्य भागात ज्या ठिकाणी २००० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडतो, तेथे उष्ण कटिबंधीय सदाहरित वने आढळतात. | ब्राझीलमध्ये उत्तरेकडील प्रदेशात (ॲमेझॉन नदी खोरे) सदाहरित वने आढळतात. | |
4. | काटेरी झुडपी वने | |
राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि तमिळनाडू या राज्यांत ज्या ठिकाणी कमी पाऊस पडतो, तिथे काटेरी झुडपी वने आढळतात.0 | ब्राझीलच्या ईशान्येकडील भागात काटेरी झुडपी वने (कटिंगा) आहेत | |
5. | समुद्रकाठाची वने | |
भारतात पूर्व किनाऱ्यावर काही भागांत समुद्रकाठाची वने आढळतात. | ब्राझीलमध्ये भारताप्रमाणे समुद्रकाठाची वने आढळत नाहीत. |
shaalaa.com
नैसर्गिक वनस्पती व प्राणी
Is there an error in this question or solution?
RELATED QUESTIONS
"नैसर्गिक वनस्पती व प्राणी" या पाठात दिलेली माहिती, आकृत्या व नकाशे यांच्या आधारे माहिती भरा.
अ.क्र. | वनांचा प्रकार | गुणधर्म | भारतातील प्रदेश | ब्राझीलमधील प्रदेश |
१. | उष्ण कटिबंधीय वने | १. रुंदपर्णी सदाहरित वृक्ष | ||
२. | निम वाळवंटी काटेरी वने |
१. २. |
||
३. | ‘सॅव्हाना’ | १. तुरळक झुडपांसारखी झाडे/तुरळक झुडपे व अवर्षण प्रतिकारक गवत | ||
४. | उष्ण कटिबंधीय निम पानझडी | १. मिश्र स्वरूपाच्या वनस्पती | ||
५. | गवताळ प्रदेश | १. अर्जेंटिनातील 'पंपास' प्रमाणे गवताळ प्रदेश |
जोड्या जुळवा.
गट अ | गट ब |
(अ) सदाहरित वने | (i) सुंद्री |
(आ) पानझडी वने | (ii) पाईन |
(इ) समुद्रकाठची वने | (iii) पाऊ ब्रासील |
(ई) हिमालयीन वने | (iv) खेजडी |
(उ) काटेरी व झुडपी वने | (v) साग |
(vi) आमर | |
(vii) साल |
ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणिजीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा.
ब्राझीलला व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड दयावे लागते?
भौगोलिक कारणे लिहा.
हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते.