Advertisements
Advertisements
Question
ब्राझीलला व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड दयावे लागते?
Short Answer
Solution 1
- वन्यजीवांच्या अनेक प्रजाती नष्ट होणे: दोन्ही देशांमध्ये वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. याचे मुख्य कारण बेकायदेशीर तस्करी, दुर्मिळ प्राण्यांची शिकार, प्रदूषण इत्यादी आहे.
- जंगलतोड: शेतीसाठी जंगलातील जमीन साफ करण्यासाठी झाडे तोडली आणि जाळली जातात. या जमिनीवर काही वर्षे उदरनिर्वाह शेती केली जाते. मात्र, काही वर्षांनी जमीन सुपीकता गमावल्यावर नवीन जंगलतोड केली जाते. त्यामुळे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उदाहरणार्थ, ब्राझीलमधील ‘रोका’ आणि ईशान्य भारतातील ‘झूम’ शेतीमुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास झाला आहे.
- प्रदूषण: पर्यावरणासाठी प्रदूषण हे मोठे संकट बनले आहे. प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. वरील पर्यावरणीय समस्यांमुळे केवळ पर्यावरणालाच हानी पोहोचली नाही, तर अनेक स्थानिक वनस्पती व प्राणीप्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
shaalaa.com
Solution 2
- वाढत्या लोकसंख्येच्या निवासासाठी, इंधनासाठी व स्थलांतरित शेतीसाठी दोन्ही देशांत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही देशांना निर्वनीकरण समस्येला सामोरे जावे लागत आहे.
- दोन्ही देशांतील वाढत्या नागरीकरणामुळे प्रदूषणाच्या समस्येत वाढ झाली आहे.
- वाढते प्रदूषण, निर्वनीकरण इत्यादी कारणांमुळे दोन्ही देशांना पर्यावरणाच्या ऱ्हासाची समस्येला तोंड दयावे लागत आहे.
- पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दोन्ही देशांतील विविध प्रजातींच्या वनस्पती, प्राणी व पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
shaalaa.com
नैसर्गिक वनस्पती व प्राणी
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
"नैसर्गिक वनस्पती व प्राणी" या पाठात दिलेली माहिती, आकृत्या व नकाशे यांच्या आधारे माहिती भरा.
अ.क्र. | वनांचा प्रकार | गुणधर्म | भारतातील प्रदेश | ब्राझीलमधील प्रदेश |
१. | उष्ण कटिबंधीय वने | १. रुंदपर्णी सदाहरित वृक्ष | ||
२. | निम वाळवंटी काटेरी वने |
१. २. |
||
३. | ‘सॅव्हाना’ | १. तुरळक झुडपांसारखी झाडे/तुरळक झुडपे व अवर्षण प्रतिकारक गवत | ||
४. | उष्ण कटिबंधीय निम पानझडी | १. मिश्र स्वरूपाच्या वनस्पती | ||
५. | गवताळ प्रदेश | १. अर्जेंटिनातील 'पंपास' प्रमाणे गवताळ प्रदेश |
जोड्या जुळवा.
गट अ | गट ब |
(अ) सदाहरित वने | (i) सुंद्री |
(आ) पानझडी वने | (ii) पाईन |
(इ) समुद्रकाठची वने | (iii) पाऊ ब्रासील |
(ई) हिमालयीन वने | (iv) खेजडी |
(उ) काटेरी व झुडपी वने | (v) साग |
(vi) आमर | |
(vii) साल |
ब्राझील व भारतातील नैसर्गिक वनप्रकारांतील फरक सांगा.
ब्राझील आणि भारतातील वन्य प्राणिजीवन व नैसर्गिक वनस्पती यांचा सहसंबंध स्पष्ट करा.
भौगोलिक कारणे लिहा.
हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते.