Advertisements
Advertisements
Question
चित्र पाहा. संवाद वाचा.
नीता: | आजी हे बघ, नदीतलं पाणी दिसतच नाही. |
आजी: | हो, नदीत जलपर्णी उगवली आहे. |
नीता: | जलपर्णी म्हणजे काय गं आजी? |
आजी: | पाण्यात उगवणारी वनस्पती. |
नीता: | ती पाण्यात का उगवते? |
आजी: | पाणी अशुद्ध, प्रदूषित झालं की उगवते. |
नीता: | आजी, आपल्यामुळेच नदीचं पाणी प्रदूषित झालयं ना! |
आजी: | हो, माणसांच्या वाईट सवयींमुळे नदीची हानी होत आहे. शहराच्या सांडपाण्यातून, रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेत जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यातील किंवा कारखान्याच्या सांडपाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरस ही द्रव्ये पाण्यात मिसळली की जलपर्णी वाढते. जलपर्णीची वाढ ही खऱ्या अर्थाने जलप्रदुषणाची निदशर्क आहे. |
नीता: | अरेरे! आजी, आता याजलपर्णीचं काय करायचं? |
आजी: | पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यायची. |
नदीचे पाणी कशामुळे प्रदूषित होते?
Short Answer
Solution
नदीचे पाणी माणसाच्या वाईट सवयींमुळे प्रदूषित होते. शहरातून सोडले जाणारे सांडपाणी, रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेतजमिनीतून झिरपणारे पाणी किंवा कारखान्याच्या सांडपाण्यामधील नायट्रोजन व फॉस्फरस या द्रव्यांमुळे नदीचे पाणी प्रदूषित होते.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
Is there an error in this question or solution?