Advertisements
Advertisements
Question
दादासाहेब फाळके यांच्याविषयी माहिती आंतरजालाच्या साहाय्याने मिळवा. दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित व्यक्तींची यादी तयार करा.
Solution
धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके (जन्म : त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र, - नाशिक, १६ फेब्रुवारी १९४४). धुंडिराज गोविंद फाळके हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिली व्यक्ती होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . १९१३ साली त्यांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा मूक चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपटांची व २६ लघुपटांची निर्मिती केली. भारतीय अभिनेत्यांना त्यांच्या जन्मभरच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील दादासाहेब फाळके पुरस्कार हा सर्वांत मोठा पुरस्कार दिला जातो. दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथाकार होते. थोडक्यात काय तर ते चित्रपट महर्षी म्हणूनही ओळखले जातात.
दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेले काही लोक पुढीलप्रमाणे आहेत.
- राज कपूर
- सत्यजित राय
- अशोक कुमार
- लता मंगेशकर
- दिलीप कुमार
- आशा भोसले
- यश चोप्रा
- देव आनंद
- श्याम बेनेगल
- गुलजार