English

दूरदर्शन या माध्यमात कोणते बदलत झाले आहेत? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

दूरदर्शन या माध्यमात कोणते बदलत झाले आहेत?

Answer in Brief

Solution

  1. भारतात स्वातंत्र्योत्तर कालखंडात दूरदर्शनचे आगमन झाले. सुरुवातीला कृष्णधवल असणारे दूरदर्शन पुढे रंगीत झाले. सुरुवातीला मोजकेच कार्यक्रम आणि ठरावीक वेळ मनोरंजन असे दूरदर्शनचे स्वरूप होते. पुढे शैक्षणिक उपक्रम, वार्तापत्रे, राष्ट्रपती-प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्यांचे सविस्तर वार्तांकन, बातम्या असे एक-एक उपक्रम वाढत गेले.
  2. रामायण आणि महाभारत या मालिकांच्या काळात बहुसंख्य लोक दूरदर्शनसमोर बसून असायचे. या माध्यमाच्या लोकप्रियतेची चुणूक या मालिकांनी दाखवून दिली. 1991 च्या इराक युद्धाचे जिवंत दृश्य वार्तांकन सीएनएन वाहिनीने जगभर दाखवले. या टप्प्यावर भारतातील वृत्तवाहिन्यांचे विश्वच बदलून गेले. 1998 मध्ये स्टार (सॅटेलाइट टेलिव्हिजन एशिया रिजन) हा खासगी उद्योगसमूह भारतात आला. यामुळे भारतातील सुरुवातीच्या काळातील नीरस, एकसुरी, प्रचारकी स्वरूपाच्या बातम्यांचे विश्वच बदलून गेले.
  3. भाषा, सादरीकरणाचे तंत्र, तंत्रसज्ज स्टुडिओ आणि ओबी (आउटडोअर ब्रॉडकास्टिंग) व्हॅन्सचा वापर यांमुळे या वाहिन्यांनी विस्तार घडवून आणला. यामुळे वार्तांकनात खुलेपणा, बहुविधता आली. देशाचा कानाकोपरा जोडला गेला.
shaalaa.com
दूरदर्शन मध्ये बदल
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.1: बदलते जीवन : भाग २ - स्वाध्याय [Page 54]

APPEARS IN

Balbharati History and Political Science (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 1.1 बदलते जीवन : भाग २
स्वाध्याय | Q ४. (३) | Page 54
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×