Advertisements
Advertisements
Question
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
महाराष्ट्रातील बाराव्या-तेराव्या शतकातील मंदिरांना 'हेमाडपंती' मंदिरे असे म्हणतात. हेमाडपंती मंदिराच्या बाह्य भिंती बर्याचदा तारकाकृती असतात. तारकाकृती मंदिराच्या बांधणीत मंदिराची बाह्य भिंत अनेक कोनांमध्ये विभागली जाते. त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम पाहण्यास मिळतो. हेमाडपंती मंदिरांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतीचे दगड साधण्यासाठी चुना वापरलेला नसतो. दगडांमध्येच एकमेकांत घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते. मुंबईजवळील अंबरनाथ येथील अंब्रेशवर, नाशिकजवळचे सिन्नर येथील गोंदेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ही हेमाडपंती मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत. त्यांची बांधणी तारकाकृती प्रकारची आहे. त्याखेरीज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमाडपंती मंदिरे पहावयास मिळतात. |
- हेमाडपंती मंदिरांची बाहय भिंत कशाप्रकारे बांधलेली असते? (1)
- हेमाडपंती मंदिरांची उदाहरणे सांगा. (1)
- हेमाडपंती मंदिरांची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत? (2)
Short Answer
Solution
- हेमाडपंती मंदिराच्या बाह्य भिंती बर्याचदा तारकाकृती असतात. तारकाकृती मंदिराच्या बांधणीत मंदिराची बाह्य भिंत अनेक कोनांमध्ये विभागली जाते. त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम पाहण्यास मिळतो.
- मुंबईजवळील अंबरनाथ येथील अंब्रेशवर, नाशिकजवळचे सिन्नर येथील गोंदेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ही हेमाडपंती मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत.
- हेमाडपंती मंदिरांची मुख्य वैशिष्ट्ये:
- हे मंदिरे महाराष्ट्रात बाराव्या ते तेराव्या शतकात बांधली गेली आहेत.
- या मंदिरांच्या भिंती बांधताना दगडांना सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो. दगडांना कातलेल्या खोबणी आणि कुसूंच्या साहाय्याने एकमेकांत घट्ट बसवले जाते, अशाप्रकारे ही भिंत उभारली जाते.
- हेमाडपंती मंदिरांच्या बांधकामात बाह्य भिंती तारकाकृती असतात. या प्रकारच्या बांधणीत बाह्य भिंत अनेक कोनांमध्ये विभागलेली असते. यामुळे भिंतींवर असलेल्या शिल्पांवर छायाप्रकाशाचा सुंदर आणि आकर्षक परिणाम दिसून येतो.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?