English

ई-बँकिंग सेवा स्पष्ट करा. - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

Question

ई-बँकिंग सेवा स्पष्ट करा.

Long Answer

Solution

ई-बँकिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक बँकिंग होय. ई-बँकिंगला आभासी बँकिंग(Virtual Banking) असेही म्हणतात. ई-बँकिंग हे संगणक आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील विकासाचे फलित आहे. ई-बँकिंग अंतर्गत बँकिंग कार्यांचे संगणकीकरण केले जाते. 

  1. स्वयंचलित नगद प्रदान सुविधा (ATM): स्वयंचलित नगद्‌ प्रदान सुविधा (ATM) पैसे काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी ग्राहक स्वतः वापर करतात, तसेच विविध सुविधांसाठी जसे की, शिल्लक नगद चौकशी, पैसे हस्तांतरण, धनादेश पुस्तक मागणी, खाते विवरणासाठी देखील याचा उपयोग होतो.
  2. क्रेडिट कार्ड: क्रेडिट कार्ड म्हणजे पेमेंट कार्ड होय.सदर कार्डाद्वारे कार्डधारक विविध बाबींसाठी पैसे खर्च करू शकतात. सुविधा देणारी बँक एक प्रकारचे तरल खाते तयार करून ग्राहकांना विशिष्ट पैसे वापरण्याची सुविधा देते. सदर कार्डामुळे कार्डधारकास रोख रक्‍कम बाळगण्याची आवश्यकता नसते.
  3. डेबिट कार्ड: आजकाल बहुतेक बँका खातेदारांनी खाते चालू करताच डेबिट कार्डाची सुविधा प्रदान करतात. डेबिट कार्डद्वारे रक्‍कम कार्डधारकाच्या खात्यामधून ताबडतोब अदा केली जाते. काही बँका ग्राहकांच्या गरजेनुसार वैयक्तिकृत कार्ड सुविधा प्रदान करतात.
  4. RTGS सुविधा (Real Time Gross Settlement): RTGS म्हणजे Real Time Gross Settlement तत्काळ निधी हस्तांतर प्रणाली सुविधा होय. या सुविधेमध्ये तत्काळ (Real Time) आणि स्थूल आधारावर (Gross Settlement) एका बँकेमधून दुसऱ्या बँकेत निधी हस्तांतरण होते. ही बँकिंग प्रणालीमधील सर्वात वेगवान निधी हस्तांतर सुविधा आहे.
  5. राष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधा (National Electronic fund Transfer): या प्रणाली अंतर्गत निधी एका शाखेतून दुसऱ्या शाखेत किंवा एका बँकेमधून देशातील दुसऱ्या बँकेत हस्तांतरित केला जातो. सदर सुविधेसाठी ग्राहकाला शाखेचा हस्तांतर सांकेतिक क्रमांक (NEFT Code) आणि लाभार्थ्यांचे (Beneficiary) तपशील द्यावे लागतात.
  6. नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग (Internet Banking Mobile Banking): नेट आणि मोबाईल बँकिंग ची सोय उपलब्ध झाल्यानंतर ग्राहक संगणक, लॅपटॉप, मोबाईल इ. संसाधनांच्या मदतीने व्यवहार करण्यास सक्षम आहेत. मोबाईल/भ्रमणध्वनी बँकिंग म्हणजे भ्रमणध्वनीच्या साहाय्याने सेवांचा वापर करणे. या सुविधेसाठी या सुविधेसाठी ग्राहकाला बँकेत नोंदणी केल्यानंतर विशिष्ट क्रमांक मिळतो.
  7. तत्काळ पैसे देयक सुविधा (Instant Money Payment System): ही सुविधा ग्राहकांना इतर कोणत्याही बँक खात्यात त्वरित निधी हस्तांतरित करण्यास सुविधा उपलब्ध करून देते.
shaalaa.com
ई-बँकिंग सेवा
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×