Advertisements
Advertisements
Question
ग्राहकांचे अधिकार स्पष्ट करा.
Solution
जनतेसाठी चळवळ संघटित केली जाते, ह्या मोहिमेचे यश हे जनतेच्या जागरूकतेवर अवलंबून असते. ग्राहकाचे संरक्षण आणि सुरक्षितता यात ग्राहकाचे अधिकार महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. व्यवसायाची उदिद्ष्टे ग्राहकांना संपूर्ण समाधान दिल्यानंतरच साध्य होतात. प्रत्येक ग्राहकाने आपल्या अधिकारासंबंधी जागरूक राहून त्यांचा दैनंदिन जीवनात वापर केला पाहिजे. तसेच ग्राहकांच्या अधिकारासाठी लढा देऊन व्यवसाय, उत्पादक आणि व्यापारी इत्यादींवर अधिकाराच्या संरक्षणासाठी दबाव निर्माण केला पाहिजे.
- सुरक्षिततेचा अधिकार - सुरक्षिततेच्या अधिकारामुळे, ग्राहकांचे आरोग्य आणि जिवितास धोकादायक असलेले उत्पादन, उत्पादन प्रक्रिया आणि सेवा यांपासून संरक्षण मिळते. या अधिकाराचा ग्राहकाचे दीर्घकालीन हित आणि त्वरित गरजांशी संबंध असतो. या अधिकारानुसार ग्राहकाचे आरोग्य आणि जीवितास संपूर्ण संरक्षण व सुरक्षितता मिळाली पाहिजे. ही सुरक्षितता औषधे, विद्युत उपकरणे आणि खादय पदार्थ इ. संबंधित असली पाहिजे. भारत सरकारने ॲगमार्क, आय.एस.आय., बी.आय.एस., हॉलमार्क इ.दवारे सुरक्षिततेची मानके निश्चित केली आहेत.
- माहितीचा अधिकार - माहितीच्या अधिकारानुसार ग्राहकास उत्पादन व सेवासंबंधीची पुरेशी माहिती उदा: किंमत, उत्पादकाचे नाव, उत्पादनाचे घटक, उत्पादनाचा बॅच क्रमांक, उत्पादनाचा दिनांक ब उत्पादन वापरण्याची अंतिम तारिख, माहितीपुस्तिका आणि सुरक्षिततेसंबंधीच्या सूचना इ. देणे आवश्यक आहे. हा अधिकार ग्राहकास योग्य उत्पादक व सेवांची निवड करण्यासाठी सक्षम बनवितो. माहितीचा अधिकार खाद्यपदार्थ, औषधे, सुटे भाग आणि इतर उत्पादने व सेवांसाठी लागू पडतो.
- वस्तू/सेवा निवडीचा अधिकार - भारतीय ग्राहकास दूरसंचार, वाहतूक आणि पर्यटन, बँकींग, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, ग्राहकोपयोगी वस्तू (FMCG) इ. वस्तू/सेवा निवडण्याचा अधिकार आहे. या अधिकारानुसार ग्राहकास त्याची गरज आणि खरेदी क्षमता इ. नुसार वस्तू व सेवा निवडण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. वस्तू निवडीची अधिकार हा मुक्त अर्थव्यवस्थेच्या संज्ञेशी संबंधित असून या अधिकारानुसार विक्रेते ग्राहकास विशिष्ट उत्पादन खरेदीसाठी सक्ती करू शकत नाहीत. परिणामी विक्रेत्याची मक्तेदारी टाळणे शक्य होते.
- ग्राहकाचे ऐकून घेण्याचा अधिकार - प्रत्येक व्यवसाय संघटनेने ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्या सोडविल्या पाहिजेत. या अधिकारानुसार ग्राहकास ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच उत्पादनाचा दर्जा, प्रमाण, किंमत आणि बांधणी इ. संबंधीच्या सूचना उत्पादक आणि व्यापाऱयास देण्याचा अधिकार ग्राहकास देण्यात आला आहे. आजच्या काळात ग्राहक, पोर्टल किंवा मोबाईल अँप्लीकेशनद्वारे ऑनलाईन तक्रार दाखल करू शकतो.
- ग्राहक शिक्षणाचा अधिकार - प्रत्येक ग्राहकास त्यांचे अधिकार आणि समस्या व त्यावरील उपाय समजून घेण्याचा अधिकार आहे. हा अधिकार ग्राहकात जागरूकता निर्माण करतो. जागरूक ग्राहक योग्य वस्तू /सेवेची निवड करू शकतो. तसेच अधिकार व हिताचे, अनैतिक व्यापाऱ्याकडून केल्या जाणाऱ्या शोषणापासून संरक्षण करू शकतो. म्हणून ग्राहक शिक्षणास प्राधान्य देणे आवश्यक आहे. ग्राहकास प्रचलित कायदे आणि कायदेशीर प्रक्रिया यांचे शिक्षण व प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. शासन प्रसार माध्यम आणि अशासकीय संस्था ग्राहक शिक्षणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. उदा. जागो ग्राहक जागो अभियान
- प्रतिनिधित्त्व करण्याचा अधिकार - ग्राहक संरक्षण कायद्यातील १९९६ च्या दुरुस्तीनुसार ग्राहक प्रतिनिधित्त्वाचा अधिकार देण्यात आला आहे. कायद्यानुसार ग्राहकास वैयक्तिक किंवा सामूहिकपणे ग्राहक मंचात ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी प्रतिनिधित्त्व करण्याची संधी देण्यात आली आहे. विधीज्ञाशिवाय प्रतिनिधित्त्व करण्याची परवानगी ग्राहकास कायद्याद्वारे देण्यात आली आहे.
- तक्रार निवारणाचा अधिकार - केवळ तक्रार दाखल करणे ग्राहकास न्याय देण्यासाठी पुरेसे नाही, म्हणून हा अधिकार दावे योग्य पद्धतीने मिटविण्याचे सूचित करतो. हा कायदा सदोष उत्पादने व सेवांची दुरुस्ती, बदली किंवा नुकसान भरपाई इ. ची मागणी करण्यासाठी ग्राहकास सक्षम बनवितो. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करून दावे मिटविण्यासाठी त्रिस्तरीय तक्रार निवारण यंत्रणा उदा. जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग निर्माण करण्यात आली आहे. यामुळे व्यवसायाच्या अनिष्ट व्यापारी प्रथांपासून ग्राहकाचे संरक्षण होते.
- निरोगी पर्यावरणाचा अधिकार - ग्राहकांना निरोगी आणि स्वच्छ पर्यावरण मिळविण्याचा अधिकार आहे. या अधिकारानुसार प्रदूषण करणाऱ्या व्यवसायाविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी ग्राहक करू शकतो. ग्राहकास वर्तमान काळात आणि भविष्यकाळातही निरोगी आणि स्वच्छ पर्यावरण मिळविण्याचा अधिकार आहे.
- अनिष्ट व्यापारी प्रथांपासून संरक्षणाचा अधिकार - ग्राहक संरक्षण कायद्यातील १९९३ च्या दुरुस्तीनुसार हा अधिकार देण्यात आला आहे. या अधिकारानुसार ग्राहकांना व्यवसायाच्या अनिष्ट व्यापारी प्रथा उदा. काळा बाजार, नफेखोरी, सदोष वजने व मापे, अवाजवी किंमती आणि भेसळ इ. पासून संरक्षण देण्यात आले आहे.
- बनावट वस्तूपासून संरक्षणाचा अधिकार - हा अधिकार आरोग्यास धोकादायक, बनावट आणि जीवितास धोका निर्माण करण्याऱ्या वस्तूंचे विपणन करण्याऱ्या कृती विरुद्ध आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:
वस्तू/सेवा निवडीचा अधिकार
विक्रेत्याने ग्राहकाच्या अधिकारास मान्यता दिली पाहिजे.
खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा.
श्री. अशोक यांनी एका दुकानातून ₹ ७०० ला बूट खरेदी केले. विक्रेत्याने त्यांना सर्वसाधारण कंपनीचे मोठ्या मापाचे बूट योग्य आहेत म्हणून खरेदी करण्यास सक्ती केली.
घरी पोहचल्यानंतर असे आढळून आले की, श्री. अशोक यांच्यासाठी बूट मोठे झाले आहेत. म्हणून त्यांनी दुकानदाराकडे यासंबंधी तक्रार केली. परंतु, दुकानदाराने बुटाचा साठा असतांनाही बूट देण्यास नकार दिला. वरील घटनेत:
- ग्राहकाच्या कोणत्या अधिकाराचे उल्लंघन झाले आहे?
- श्री. अशोक हे खरेदीदार आहेत की अंतिम वापरकर्ते?
- श्री: अशोक यांनी तक्रार कोठे केली पाहिजे?