Advertisements
Advertisements
Question
खालील संज्ञा/संकल्पना स्पष्ट करा:
वस्तू/सेवा निवडीचा अधिकार
Solution
भारतीय ग्राहकास दूरसंचार, वाहतूक आणि पर्यटन, बँकींग, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, ग्राहकोपयोगी वस्तू (FMCG) इ. वस्तू/सेवा निवडण्याचा अधिकार आहे. या अधिकारानुसार ग्राहकास त्याची गरज आणि खरेदी क्षमता इ. नुसार वस्तू व सेवा निवडण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. वस्तू निवडीची अधिकार हा मुक्त अर्थव्यवस्थेच्या संज्ञेशी संबंधित असून या अधिकारानुसार विक्रेते ग्राहकास विशिष्ट उत्पादन खरेदीसाठी सक्ती करू शकत नाहीत. परिणामी विक्रेत्याची मक्तेदारी टाळणे शक्य होते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
विक्रेत्याने ग्राहकाच्या अधिकारास मान्यता दिली पाहिजे.
खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा.
श्री. अशोक यांनी एका दुकानातून ₹ ७०० ला बूट खरेदी केले. विक्रेत्याने त्यांना सर्वसाधारण कंपनीचे मोठ्या मापाचे बूट योग्य आहेत म्हणून खरेदी करण्यास सक्ती केली.
घरी पोहचल्यानंतर असे आढळून आले की, श्री. अशोक यांच्यासाठी बूट मोठे झाले आहेत. म्हणून त्यांनी दुकानदाराकडे यासंबंधी तक्रार केली. परंतु, दुकानदाराने बुटाचा साठा असतांनाही बूट देण्यास नकार दिला. वरील घटनेत:
- ग्राहकाच्या कोणत्या अधिकाराचे उल्लंघन झाले आहे?
- श्री. अशोक हे खरेदीदार आहेत की अंतिम वापरकर्ते?
- श्री: अशोक यांनी तक्रार कोठे केली पाहिजे?
ग्राहकांचे अधिकार स्पष्ट करा.