Advertisements
Advertisements
Question
एखाद्या घटनेचे साहित्यात कसे प्रतिबिंब उमटते आणि कवी एखाद्या घटनेकडे कसे बघतो याचे एक उदाहरण कविवर्य कुसुमाग्रज यांच्या ‘आवाहन’ या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रचलेल्या कवितेत आहे.
बर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचे कोसळते
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते!
असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे
अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर खळे
कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे
साममंत्र तो सरे, रणाची नौबत आता धडधडते
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते!
अशाच प्रकारच्या अनेक घटनांवर आधारित लिहिलेल्या साहित्याचा शोध घ्या.
Solution
उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू अभिमान थरू,
बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू
परक्यांचा येता हल्ला, प्रत्येक घर बने किल्ला
हे कोटि कोटि भुजंड, होतील इथे ध्वजदंड
छातीची करुनी ढाल, लाल या संगिनीस भिडवू
बलवंत उभा हिमवंत, करि हैवानाचा अंत
हा धवलगिरी हा नंगा, हा त्रिशूळ कांचनगंगा
जरि झुंड पुंड शत्रूंची आली, खिंड खिंड लढवू
जरि हजार अमुच्या जाती, संकटामध्ये विरघळती
परचक्र येतसे जेंव्हा, चौदांची एकच जिव्हा
मग पक्ष, पंथ जरि लक्ष आमुचे, सागरात बुडवू
राष्ट्राचा दृढ निर्धार, करु प्राणपणे प्रतिकार
ह्या नसानसांतिल रक्त, जाळील आसुरी तख्त
आम्ही न कुणाचे दास, नवा इतिहास पुन्हा घडवू
अन्याय घडो शेजारी, की दुनियेच्या बाजारी
धावून तिथेही जाऊ, स्वातंत्र्य-मंत्र हा गाऊ
स्वातंत्र्य, बंधुता, समता यांचा घोष सदा घुमवू
- वसंत बापट