Advertisements
Advertisements
Question
फरक स्पष्ट करा.
भारत वन्य जीवन व ब्रझील वन्य जीवन
Distinguish Between
Solution
भारत वन्य जीवन | ब्रझील वन्य जीवन | |
1. | हिमालयातील बर्फाळ प्रदेशामध्ये हिमचित्ते व याक आढळतात, तर द्वीपकल्पीय प्रदेशात भारतीय गवा, काळवीट, अनेक प्रकारची हरणे, माकड इत्यादी प्राणी आढळतात. उष्ण व आर्द्र वनांमध्ये हत्ती मोठ्या प्रमाणावर आढळतात, तर वाळवंटी प्रदेशामध्ये रानटी गाढवे व उंट आढळतात. | ब्रझीलमध्ये गिनीपिग, मगरी, सुसरी, माकडे, प्युमा, बिबट्या इत्यादी प्राणी आढळतात. |
2. | आसाममधील दलदलीच्या प्रदेशात एकशिंगी गेंडा आढळतो. | पँटानल या दलदलीच्या प्रदेशात महाकाय ॲनाकोंडा आढळतात. |
3. | भारतात नद्या, खाड्या व किनार्यावरील प्रदेशांमध्ये कासव, मगर, सुसर इत्यादी प्राणी आढळतात. | ब्रझीलमध्ये समुद्रात स्वार्डफिश, तर नदीत पिर्हाना व गुलाबी डॉल्फिन हे मासे आढळतात. |
4. | भारतातील वनप्रदेशांमध्ये मोर, खंड्या, तितर, कबुतरे, विविधरंगी, पोपट; पाणथळ जागी बदके व बगळे, तर गवताळ प्रदेशात माळढोकसारखे पक्षी आढळतात. | ब्राझीलमध्ये पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये कोंडोर, विविध प्रकारचे पोपट, मकाव, फ्लेमिंगो हे पक्षी आढळतात. |
shaalaa.com
भारत - वन्य जीवन
Is there an error in this question or solution?