English

टिपा लिहा. भारत वन्यजीवन - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

टिपा लिहा.

भारत वन्यजीवन

Answer in Brief

Solution

  1. भारतात वन्यप्राण्यांच्या अनेक प्रजाती असल्याने भारतातही वन्यप्राण्यांमध्ये विविधता आढळते.
  2. भारतात उष्ण व आर्द्र वनांमध्ये हत्ती आढळतात.
  3. आसाममध्ये दलदलीच्या प्रदेशात एकशिंगी गेंडा आढळतो, तर वाळवंटी प्रदेशामध्ये रानटी गाढवे व उंट आढळतात.
  4. हिमालयातील बर्फाळ प्रदेशामध्ये हिमचित्ते व याक आढळतात, तर द्वीपकल्पीय प्रदेशात भारतीय गवा, काळवीट, अनेक प्रकारची हरणे, माकड इत्यादी प्राणी आढळतात.
  5. भारतात नद्या, खाड्या व किनार्यावरील प्रदेशामध्ये कासव, मगर, सुसर इत्यादी प्राणी आढळतात.
  6. वनप्रदेशामध्ये मोर, खंड्या, तितर, कबुतरे, विविधरंगी पोपट, पाणथळ जागी बदके व बगळे, तर गवताळ प्रदेशामध्ये माळढोकसारखे पक्षी आढळतात.
  7. वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे.
shaalaa.com
भारत - वन्य जीवन
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: नैसर्गिक वनस्पती व प्राणी - टिपा लिहा.

APPEARS IN

SCERT Maharashtra Geography [Marathi] 10 Standard SSC
Chapter 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी
टिपा लिहा. | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×